कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; परिसरात मोठा तणाव

कर्नाटकातील शिवमोगामध्ये 23 वर्षाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हर्षा नावाच्या या तरुणाची हत्या झाल्यानंतर शिवमोगा परिसरात मोठा तणाव पसरला आहे

Updated: Feb 21, 2022, 10:56 AM IST
कर्नाटकात बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची निर्घृण हत्या; परिसरात मोठा तणाव title=

शिवमोगा : कर्नाटकातील शिवमोगामध्ये 23 वर्षाच्या एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. हर्षा नावाच्या या तरुणाची हत्या झाल्यानंतर शिवमोगा परिसरात मोठा तणाव पसरला आहे. येथे पोलिसांनी कलम 144 लागू केले आहे. हत्या झालेला तरुण बजरंग दलाचा कार्यकर्ता असल्याचे सांगण्यात येत आहे.

रविवारी कर्नाटकातील शिवमोगा शहरातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली आहे. यानंतर जिल्ह्यात तणावपूर्ण स्थिती दिसून येत आहे. शिवमोगा येथील तणावपूर्ण स्थिती नियंत्रित ठेवण्यासाठी कलम 144 लावण्यात आले आह. सोबतच शिक्षण संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत.

या तरुणाची हत्या शिवमोगा येथील भारती कॉलनी स्थित पेट्रोल पंपाजवळ केली आहे. हत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.