बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव विधानसभेत मांडला. या ठरावावर थोड्याच वेळात मतदान सुरु होणार आहे. त्याआधी कुमारस्वामी यांनी भाजपवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बी एस येडियुरप्पा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पुढील पाच वर्षे मीच मुख्यमंत्री राहणार आहे,असा विश्वास व्यक्त करताना काँग्रेसलाही एक प्रकारे इशारा दिलाय. दरम्यान, राज्यातील शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्ज माफी देण्यावर भर राहिलं. राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे मला तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, असे सांगत भाजपला सुनावले.
दरम्यान, विश्वासदर्शक ठरावाच्याआधी विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. आर. रमेश कुमार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपचे वरिष्ठ नेते सुरेशकुमार यांनी अध्यक्ष निवडणुकीतून माघार घेतली.
Bengaluru: Congress Legislative Party meeting underway in Vidhana Soudha pic.twitter.com/IrYD37yo9V
— ANI (@ANI) May 25, 2018
- यापूर्वी मी माझ्या वडिलांच्या निर्णयाविरोधात गेलो होतो आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी माझे वडील आजारी पडले होते. जातीयवादी पक्षासोबत जाऊ नको अस त्यांच मत होतं
- २००६ मध्ये मी त्याना जो मानसीक त्रास दिला; तो आत्ता देऊ इछीत नाही. म्हणून मी काँग्रेसने दिलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली. मला मुख्यमंत्री पदाची हाव नाही
- माझ्या वडिलांच्या इच्छेनुसार मी काँग्रेससोबत जायचा निर्णय घेतला. जो डाग माझ्यामुळे वडिलांच्यावर लागला होता; तो पुसण्याचा माझा प्रयत्न.
- २००८ मध्ये देखील भाजपला बहुमत नव्हते पण काँग्रेसने जाऊदे म्हणून सत्ता देवून टाकली होती; हे विसरून चालणार नाही.
- राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी कशी द्यायचे हे मला तुम्ही मला सांगण्याची गरज नाही. मी भाजपा सोबत सत्तेवर असताना शेतकऱ्यांना कर्ज माफी द्या, अशी मागणी केली होती. त्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्ज माफी कस देण शक्य आहे अस मला विचारले. राज्याच्या तिजोरीत पैसे नसल्याचे सांगून मुख्यमंत्री येडियुरप्पा यानी शेतकऱ्यांना कर्ज माफी देण शक्य नाही असं सांगितले
- मी एक महिने मुख्यमंत्री होणार, दोन महिने मुख्यमंत्री होणार अस विरोधी पक्ष सांगत आहेत... पण मी विश्वास देतो मीच पाच वर्षे मुख्यमंत्री असेल.
- हे सरकार माज्या शेतकऱ्याना संपूर्ण कर्ज माफी देण्यासाठी प्रयत्नशील असेल; त्यासाठी काँग्रेस नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार.
- माझं सरकार हे आघाडीच आहे; त्यामुळे कोंग्रेसच्या नेत्यांना विश्वासात घेवूनच निर्णय घेईन
- येडियुरप्पा यांच्या पुढे जावून मी जनतेची सेवा करणारा व्यक्ती. २००८ मध्ये भाजपला सत्ता दिलेली होती; त्यावेळी त्यानी कमिशन सरकारची सुरुवात केली. 'मिशन कमळ' भाजपने राबवून काय केल हे सर्व जनतेला माहिती आहे.