सद्गुरू वासुदेव आणि मुख्यमंत्र्यांना 'ती' चूक भोवली; गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची मागणी

तक्रारदाराने सद्गुरु वासुदेव आणि मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या अटकेची मागणी केलीय

Updated: Sep 26, 2022, 01:20 PM IST
सद्गुरू वासुदेव आणि मुख्यमंत्र्यांना 'ती' चूक भोवली; गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेची मागणी  title=

Himanta Biswa Sarma Sadhguru night safari : आसाम (Assam) येथील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru) यांच्या प्रवेशावरून नवा वाद सुरु झाला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) यांनी सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्यासोबत काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात (Kaziranga National Park ) सफारी (night safari) केल्याची माहिती समोर आलीय. आसामच्या (Assam)  मुख्यमंत्र्यांनी काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात रात्रीच्या सफारीसाठी प्रवेश करून वन्यजीव संरक्षण कायदा मोडल्याचा (violating the Wildlife (Protection) Act, 1972) आरोप फेटाळून लावला आहे.

काही पर्यावरण आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी याबाबत तक्रार केली होती. यानंतर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) आणि सद्गुरू जग्गी वासुदेव (Sadhguru) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  वन्यजीव कायद्याने रात्रीच्या सफारीवर (Kaziranga Night Safari) बंदी घातली असून दोघांनी ठराविक वेळेनंतर राष्ट्रीय उद्यानात (national park) जाऊन वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. (Kaziranga Night Safari FIR against Himant Sarma and Sadhguru)

हिमंता बिस्वा सरमा यांनी काही पर्यावरण कार्यकर्ते आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मुख्यमंत्री सरमा म्हणाले की, असा कोणताही कायदा नाही की रात्रीच्या वेळी लोक त्या उद्यानात जाऊ शकत नाहीत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडिओ आणि काही स्थानिक चॅनेल्समध्ये सद्गुरु वासुदेव आणि मुख्यमंत्री यांच्यासोबत ओपन सफारी एसयूव्ही चालवताना दिसत आहेत. असे करणे म्हणजे कोणत्याही नियमाचे उल्लंघन नाही, असे सरमा यांनी उत्तरात म्हटले आहे. 

वन्यजीव कायद्यानुसार वॉर्डन रात्रीच्या वेळीही संरक्षित क्षेत्रात जाण्याची परवानगी देऊ शकतात. कोणताही कायदा लोकांना रात्रीच्या वेळी आत जाण्यास प्रतिबंध करत नाही. या हंगामात आम्ही एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी सद्गुरू आले आहेत आणि त्याआधी श्री श्री रविशंकर आले आहेत. या दोघांचे लाखो फॉलोअर्स असल्याने यंदाचा पर्यटन हंगाम काझीरंगासाठी चांगला जाईल अशी आशा आहे, असे मुख्यमंत्री सरमा म्हणाले.

एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही बाब केएनपी वनविभागाच्या अखत्यारीत येते, त्यामुळे आम्ही उद्यानाच्या विभागीय वन अधिकाऱ्यांकडून आरोपाच्या स्थितीबाबत अहवाल मागवला आहे. हा अधिकृत कार्यक्रम होता आणि काही वेळा असे कार्यक्रम काही काळ चालतात. अशा स्थितीत याला कायद्याचे उल्लंघन म्हणता येईल असे मला वाटत नाही.

अटकेची मागणी

उद्यानाजवळील मोरंगयाल आणि बालीजन गावातील रहिवासी सोनेश्वर नारा आणि प्रबीन पेगू यांनी ही तक्रार दिली आहे. ज्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा, राज्याचे पर्यटन मंत्री जयंत मल्ला बरुआ, सद्गुरु जग्गी वासुदेव आणि कार्यक्रमात उपस्थित असलेल्या सर्वांच्या अटकेची मागणी केली आहे.