मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना आज ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली.

Updated: Aug 15, 2017, 10:28 AM IST
मोहन भागवत यांना ध्वजारोहण करण्यापासून रोखले title=

पलक्कड़ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांना आज ध्वजारोहण करण्यापासून रोखण्यात आलं. केरळच्या पलक्कडमधील एका शाळेत जिल्ह्या प्रशासनाने त्यांना तिरंगा फडकण्यास मनाई केली.

कलेक्टरने शाळेला एक मेमो दिला असून यात म्हटले आहे की, कोणताही नेता सरकारच्या मदतीने चालवल्यात जात असलेल्या शाळेत भारतीय ध्वज फडकावू शकत नाही.  

कलेक्टर म्हणाले की, शाळेतील शिक्षक किंवा निवडलेले प्रतिनिधीच ध्वजारोहण करू शकतात. मात्र, भाजपने कलेक्टरच्या या आदेशाला अनावश्यक सांगितले आहे आणि या आदेशाला केराची टोपली दाखवत म्हणाले की, ते ध्वजारोहण करणार. भाजप आणि आरएसएसचं म्हणनं आहे की, झेंडा कोडनुसार, स्वातंत्र्य दिनी कुणीही शाळेत ध्वजारोहण करू शकतात. 

मोहन भागवत हे करनाकिय्याम्मन शाळेत सकाळी ९ वाजता ध्वजारोहण करणार होते. महत्वाची गोष्ट म्हणजे ही शाळा राष्टईय स्वयंसेवक संघाचे समर्थक चालवतात.