Kitchen Tricks: कसुरी मेथी आपल्या किचनमध्ये सहज उपलब्ध होणार पदार्थ. आजकाल प्रत्येक जेवणात कसुरी मेथीचा वापर केला जातो. कसुरी मेथी घातल्याने जेवणाला एक वेगळीच चव येते. हॉटेल रेस्टोरेंट्समध्ये जे जेवण मिळत ज्या भाज्या बनवल्या जातात त्या इतक्या टेस्टी
लागण्यामागे कसुरी मेथी (cooking tips) हे इतर अनेक सिक्रेट्सपैकी एक सिक्रेट आहे.
आजकाल बाजारात वेगवेगळ्या ब्रॅण्डच्या कसुरी मेथी मिळतात. ब्रॅण्डप्रमाणे त्याच्या किंमतीसुद्धा महाग असतात बरं, मिळणाऱ्या पाकिटात पाकिटापेक्षा कमी कसुरी मेथी दिली जाते. वापर सतत आल्याने आपल्याला वारंवार विकत घ्यावी लागते. म्हणजे एकूणच काय पैशांचा खर्च.
हिवाळा बऱ्यापैकी सुरु झाला आहे , सकाळच्या वेळी वातावरणात एक वेगळ्याच प्रकारचा आणि हवंहवंस वाटणारा गारवा जाणवू लागला आहे . तुम्हाला हे माहित असेलच प्रत्येक ऋतूत वेगवेगळ्या भाज्या बाजारात येतात. (seasonal vegetables) मेथी हिवाळ्यात भरपूर प्रमाणात
बाजारात उपलब्ध असते. मेथीपासून अनेक प्रकारच्या डिशेश बनवता येतात. (methi ka paratha) मेथी आपल्या शरीरासाठी खूप महत्वाची असते हे तर आपण जाणतोच. मेथीपासून बनलेली 'कसुरी मेथी' (kasuri methi) हा पदार्थ तर आपल्याला प्रत्येकालाच माहित आहेच. काही
भाज्यांची चव वाढवण्याचं काम कसुरी मेथी करते. मेथीच्या भाजीपासूनच कसुरी मेथी बनवली जाते हे तुम्हाला ,माहित असणारच.
कसुर मेथी आपण बाहेरून आणतो पण तुम्हाला माहीत आहे का, घरच्या घरी तुम्ही कसुरी मेथी बनवु शकता आणि वर्षभर वापरू शकता यासाठी फार वेळ आणि पैसेसुद्धा खर्च करण्याची गरज नाहीये. चला तर मग जाणून घेऊया घरच्या घरी कशी बनवाल कसुरी मेथी आणि तेही
अगदी सोप्या पद्धतीने. ( Kitchen Hacks How to Make Kasuri Methi Recipe at home )
स्टेप 1: मेथीची पानं काढून घ्या, लक्षात ठेवा पानं काढताना तुम्हला त्यात देठ घ्यायचे नाहीयेत. आता या पानांना व्यवस्थित धुवून घ्या, आणि चाळणीत सुकवायला ठेऊन द्या.
स्टेप 2: पाणी निथळल्यावर मायक्रोवेव्ह फ्रेंडली ट्रे (microwave) घ्या यात हि पानं व्यवस्थित पसरवुन घ्या मायक्रोवेव्ह हाय टेम्परेचरला सेट करा आणि ३-४ मिनिट ठेऊन द्या.
स्टेप 3: या नंतर ट्रे बाहेर काढून घ्या, पसरवलेली पानं पुन्हा एकदा हलवून घ्या आणि 2 मिनिटासाठी पुन्हा मायक्रोवेव्हमध्ये ठेऊन द्या. यानंतर काही वेळा साठी पूर्ण पाने थंड होऊ द्या.
स्टेप 4: जेव्हा मेथीची पानं पूर्णपणे थंड होतील तेव्हा दोन्ही हातात घेऊन ती रगडून पावडर बनवून घ्या.ही पावडर एका हवाबंद डब्ब्यात भरून ठेऊन द्या.
स्टेप 5 : जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर वरील सर्व प्रोसेस तुम्ही तव्यावर सुद्धा करू शकता. गॅस मोठा करून त्यावर ताव किंवा कढई ठेऊन द्या. त्यात मेथीची पानं भाजून घ्या आणि वर सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी कसुरी मेथी बनवून घ्या.
कुठलेही प्रिझर्वेटिव्ह (preservative) न वापरता घरच्या घरी वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी बनून तयार! (Kitchen Hacks How to Make Kasuri Methi Recipe at होमी)