मुंबई : आपण कोणतीही गोड वस्तु बनवली की, त्यामध्ये आपण सुक्या मेव्याचा वापर करतोच. यामुळे त्या वस्तुला चव तर येतेच परंतु ते बघतानाही आकर्षक दिसते. ड्रायफ्रुट्समध्ये बदाम, काजू, पिस्ता, मनुका, अंजीर आणि खारीक. परंतु तुम्ही कधी विचार केला आहे का की या सगळ्यामध्ये पिस्ता इतका महाग का आहे? खरेतर पिस्त्याची लागवड करणे आणि त्याच्या झाडांची काळजी घेणे सोपे नाही. बाब केवळ काळजीपुरती मर्यादित नाही, पिस्त्याच्या झाडाला फळे येण्यासाठी १५ ते २० वर्षे लागतात. याशिवाय अशी अनेक कारणे आहेत ज्यामुळे त्याची किंमत वाढते.
पिस्त्याचा पुरवठा मागणीच्या प्रमाणात होत नाही त्यामुळे देखील पिस्ता महाग आहे. कॅलिफोर्निया आणि ब्राझीलसह जगातील अनेक भागांमध्ये पिस्त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जात आहे.
15 वर्षांनंतर फक्त एका झाडातून 22 किलो पिस्ता मिळतात
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लांट (CSIR) चे तज्ज्ञ आशिष कुमार यांच्या म्हणण्यानुसार, पिस्त्याच्या झाडाची परिपक्वता 15 ते 20 वर्षांची आहे, त्यानंतर शेतकऱ्याला त्यापासून थोड्या प्रमाणात पिस्ता मिळतात.
एका झाडापासून एका वर्षात सरासरी 22 किलो पिस्ता मिळतात. पिस्त्याच्या मागणीनुसार त्याचे उत्पादन नेहमीच कमी असते. ब्राझील हा एकमेव देश आहे जिथे परिस्थिती थोडी वेगळी आहे, दरवर्षी येथे एका झाडापासून सुमारे 90 किलो पिस्ता तयार होतात.
अहवालानुसार, पिस्ता पेरल्यानंतर 15 ते 20 वर्षांनी त्यात फळे येऊ लागतात. त्यानंतर त्याच्यापासून पिस्ता तयार केला जातो. या झाडांची इतकी वर्षे काळजी घ्यावी लागते, त्यासाठी खूप खर्च येतो. काळजी घेतल्यानंतरही झाडांपासून अपेक्षेप्रमाणे पिस्ता तयार होतीलच याची शाश्वती नसते. त्याची निर्मिती करणे तितके सोपे नसते. त्यासाठी अधिक पाणी, अधिक श्रम, अधिक जमीन आणि अधिक पैसा लागतो. त्यामुळे त्याची किंमतही वाढते.
उत्पादन नाममात्र असले तरी शेतकर्यांना अधिक जमीन विकत घ्यावी लागते आणि त्याच्या लागवडीसाठी अधिक झाडे लावावी लागतात. त्याहून विशेष म्हणजे पिस्ता दरवर्षी झाडांवर येत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना दोन पिकं लावावी लागतात, ज्यामुळे त्यांना दरवर्षी उत्पन्न मिळते. त्यामुळे पुरेशी झाडे असूनही मागणीनुसार पिस्त्याचे उत्पादन होत नाही.
पिस्ता लागवडीसाठी मोठ्या प्रमाणावर मजूर लागतात. प्रत्येक पिस्ता हाताने फोडून स्वच्छ केला जातो. त्यानंतर गुणवत्तेनुसार त्याला वेगळे केले जाते. त्यांच्या वर्गीकरणादरम्यान, कोणते निर्यातीसाठी पाठवले जाईल आणि कोणते ठेवले जाईल हे देखील पाहिले जाते. अशाप्रकारे, त्यांच्या वर्गीकरणासाठी कामगारांना दिल्यावे लागणाऱ्या वेतनामुळे देखील त्यांची किंमत आणखी वाढते.
पिस्त्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्व असल्याने ते फायदेशीर आहे. यामध्ये प्रथिने, पोटॅशियम, व्हिटॅमिन-बी 6 आणि तांबे आढळतात. पिस्ती वजन, रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच डोळे देखील निरोगी ठेवते. ज्यामुळे लोकं त्याचे जास्त पैसे देऊन सेवन करतात.