कुलभूषण यांच्या आईने पाकचा प्लान 'असा' केला नाकाम

 'तु असे का करतोयस ? तु तर इराणमध्ये बिझनेस करत होतास ना ? त्यावेळी तुला किडनॅप केले ना ? तुला संपूर्ण खरी कथा सांगायला हवी होती' असे त्यांच्या आईने म्हटले.  

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Dec 28, 2017, 10:25 AM IST
कुलभूषण यांच्या आईने पाकचा प्लान 'असा' केला नाकाम title=

नवी दिल्ली : २५ डिसेंबर रोजी भारतीय नौसेनेचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची त्यांच्या मातोश्री आणि पत्नीसोबत भेट झाली. २२ महिन्यांनी आपल्या मुलाला पाहिल्यानंतर त्या मातोश्री रडतील असे वाटत असताना त्यांनी स्वत:ला सावरत कुलभूषण यांना प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. 

आईचे प्रश्न  

त्यामूळे पाकच्या 'नापाक' मनसूब्यांवर पाणी पडले आहे. 'तु असे का करतोयस ? तु तर इराणमध्ये बिझनेस करत होतास ना ? त्यावेळी तुला किडनॅप केले ना ? तुला संपूर्ण खरी कथा सांगायला हवी होती' असे त्यांच्या आईने म्हटले.  

पाकचे मनसूबे धूळीत

कुलभूषण हे खरोखर भारतीय जासूस आहेत हे या मुलाखतीच्या रेकॉर्डमधून पाक सिद्ध करायच्या प्रयत्नात होते. कूलभूषण यांची आई हो ला हो असे उत्तर देईल अशी स्क्रिप्टही त्यांनी तयार केली होती.

पण आईच्या कठोर वागण्याने पाकचे मनसूबे धूळीस मिळाले आहेत.  ७० वर्षाच्या अवंति यांनी आपल्या संयमाने पाकचे कुटील कारस्थान नाकाम केले. 

अर्ध्या तासाची भेट

हेरगिरीच्या आरोपात पाकिस्तानमध्ये कैद असणाऱ्या कुलभूषण जाधव आणि त्यांच्या कुटुंबियाची पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयात भेट झाली आहे. कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नी यांनी कुलभूषण यांची भेट मागितली होती. त्यानुसार त्यांची अर्ध्या तासाची भेट झाली.

काचेच्या आडून कुलभूषण यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याशी चर्चा केली. तब्बल दीड वर्षानंतर त्यांनी आपल्या कुटुंबियांशी पहिल्यांदा संवाद साधला. 

या भेटीवेळी पाकिस्तानातील भारतीय उप-उच्चायुक्त जे. पी. सिंगदेखील त्यांच्यासोबत होते. हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं कुलभूषण यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र भारतानं आंतरराष्ट्रीय न्यायालयात केलेल्या अपीलानंतर या शिक्षेला स्थगिती देण्यात आलीय.