'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'

काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. 

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Dec 13, 2017, 08:47 PM IST
'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...' title=

नवी दिल्ली : काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. आरएसएसमध्ये महिलांना प्रवेशही दिला जाऊ शकत नाही, अशी टीका राहुल गांधींनी केली आहे. काँग्रेस महिला संवाद संमेलनामध्ये राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं आहे.

महात्मा गांधींचा फोटो तुम्ही बघितलात तर त्यांच्या आजूबाजूला तीन ते चार महिला दिसतील. पण संघामध्ये महिलांना शिरकावही दिला जात नाही. ही त्यांची विचारधारा आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

 

गुजरातमध्ये विजयाचा भरवसा

गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार मंगळवारी संपला. गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी मतदान होणार आहे. याआधी राहुल गांधींनी गुजराती चॅनलशी बातचित केली. गुजरातमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा विश्वास राहुल गांधींनी व्यक्त केला. काँग्रेसला फक्त बहुमतच मिळणार नाही तर निकालाचे आकडे बघून सगळेच आश्चर्यचकीत होतील, अशी प्रतिक्रिया राहुल गांधींनी दिली.

'खऱ्यावर विश्वास ठेवतो'

मी खऱ्यावर विश्वास ठेवतो आणि नेहमी खरंच बोलतो, असं राहुल गांधी म्हणाले. माझ्यामध्ये कोणतेही बदल झाले नाहीत. तर माझी प्रतिमा भाजप कार्यकर्त्यांनी खराब केली आहे. यासाठी मोठ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोप राहुल गांधींनी केला.