मुंबई : सोशल मीडियावर दररोज विविध प्रकारचे भन्नाट आणि विनोदी व्हीडिओ व्हायरल होत असतात. पण नेटीझन्स मोजकेच व्हीडिओ डोक्यावर घेतात. आता एक लग्नाचा व्हीडिओ व्हायरल झालाय. या व्हीडिओत लग्नमंडपात एक तरुणी नवरदेवाला सोबत येण्याची ऑफर देत आहे. हा व्हीडिओ जब्बर व्हायरल होतोय. (Lets run away young Women offer to groom during marriage video viral)
व्हायरल होणारा व्हीडिओ अवघ्या 7 सेकंदांचा आहे. या व्हीडिओमध्ये स्टेजवर नववधू आणि नवरदेव बाजूबाजूला बसलेले आहेत. त्यांच्या शेजारी ब्राह्मण बसलेला आहे. तर स्टेजच्या शेवटी साडी नेसलेली एक तरुणी बसलेली पाहायला मिळत आहे. ही तरुणी या नवरदेवाला हातवारे करुन 'चल पळून जाऊयात', असा इशाराच जणू करतेय. यावर नवरदेवाला त्या तरुणीने केलेला इशारा समजला नाही. पण त्यानंतर त्याला त्या इशाराचा अर्थ समजतो. त्यानंतर 'आता काय फायदा, लग्न झालं' असा भाव या नवरदेवाच्या चेहऱ्यावर दिसून येतोय. त्यानंतर नकारात्मक पद्धतीने हात झटकून नवरामुलगा तरुणीला नाही सांगतो.