तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये

IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Apr 9, 2018, 07:17 PM IST
तुमच्याकडे आधार कार्ड आहे? मग रेल्वे तुम्हाला देणार १० हजार रुपये title=

नवी दिल्ली : IRCTC वरुन तुम्ही घर बसल्या १० हजार रुपये कमवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची स्किम नाहीये आणि तिकिटही बूक करण्याची गरज नाहीये. तर, तुम्हाला केवळ तुमचा आधार नंबर IRCTC अकाऊंटसोबत लिंक करायचा आहे.

IRCTC ने ही स्किम जानेवारी २०१८ मध्ये लॉन्च केली आहे आणि जून २०१८ पर्यंत लागू असणार आहे. केंद्र सरकारने सर्वच आवश्यक सेवांसाठी आधार कार्ड अनिवार्य केलं आहे. त्यानुसार, रेल्वेनेही आपल्या आयआरसीटीसी युजर्सला आपलं आधार लिंक करण्याचे आवाहन केलं आहे. तुम्ही जर आपलं आयआरसीटीसी आयडी आधारसोबत लिंक केलं असेल तर १० हजार रुपये जिंकण्याची तुम्हालाही संधी मिळू शकते.

१०,००० रुपये जिंकण्याची संधी

IRCTC ने आपल्या युजर्सला सांगितले आहे की, IRCTC अकाऊंट सोबत आधार कार्ड लिंक केल्यास १० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. IRCTC अकाऊंट सोबत आधार लिंक करणाऱ्या युजर्ससाठी एक लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. या लकी ड्रॉ मध्ये ज्याचं नाव येईल त्याला रेल्वे तर्फे १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

IRCTC ची ही स्किम जानेवारी २०१८ मध्ये सुरु करण्यात आली असून जुन २०१८ पर्यंत सुरु राहणार आहे. या लकी ड्रॉ स्किमनुसार विजेत्याला बक्षीस देण्यात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. प्रत्येक ड्रॉ मध्ये ५ भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे आणि त्यांना १० हजार रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया कम्प्यूटराईज असणार आहे.

अशा प्रकारे जिंका बक्षीस

जर तुम्हीही IRCTC च्या लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ इच्छिता तर तुम्हाला केवायसी करणं गरजेचं आहे. तसेच युजरला कमीत कमी एक पीएनआर बुक करावं लागणार आहे. तसेच युजरची डिटेल IRCTC अकाऊंट सोबत मॅच केली जाईल. जर तुम्ही एकाच पीएनआर नंबरला दोन वेळा सिलेक्ट केलं तर तुम्हाला एकाच लकी ड्रॉ चा फायदा मिळेल. मात्र, IRCTC चे कर्मचारी या लकी ड्रॉमध्ये सहभागी होण्यास पात्र नसतील असं रेल्वेने स्पष्ट केलं आहे.

काय आहेत नियम?

  • जे युजर्स रजिस्टर्ड आहेत आणि ज्यांनी आधार केवायसी केलं आहे तेच ही ऑफर घेण्यासाठी पात्र असतील. युजर्सला कमीत कमी एक पीएनआर बूक करावं लागणार आहे.
  • बुकिंग करणाऱ्या युजर्सची डिटेल त्याच्या आयआरसीटीसीवर बनवण्यात आलेल्या प्रोफाईलसोबत मॅच झाली पाहीजे.
  • ज्या युजर्सने आपली यात्रा रद्द केली आहे आणि टीडीआर फाईल केलं आहे असे युजर्स या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.
  • विजेत्यांची नावं आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात जाहीर करण्यात येतील. युजरला आपलं व्हेरिफिकेशन करणं आवश्यक आहे.
  • आयआरसीटीसीचे कर्मचारी या स्किममध्ये सहभागी होऊ शकत नाहीत.