अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी साक्षरतेची व्याख्या बदलावी, मुनगंटीवारांची मागणी

साक्षरतेची व्याख्या बदलायला हवी अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.

Updated: Jun 21, 2019, 08:12 PM IST
अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी साक्षरतेची व्याख्या बदलावी, मुनगंटीवारांची मागणी  title=

रामराजे शिंदे, झी मीडिया, मुंबई : साक्षरतेची व्याख्या बदलायला हवी अशी मागणी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. सध्या ज्याला नाव लिहता वाचता येतं तो साक्षर आहे. पण १० वी पास झालेल्यांनाच साक्षर म्हणायला हवं असं मतं मुनगंटीवार यांनी व्यक्त केले आहे. या बदलामुळे नियोजनात मदत होईल असेही ते म्हणाले. अर्थव्यवस्था सदृढ करण्यासाठी साक्षरतेची व्याख्या बदलावी लागेल असे मतंही त्यांनी यावेळी व्यक्त केले. 

केंद्रीय अर्थसंकल्प पूर्व बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी हा मुद्दा मांडला.