Minor Girl Muder Case : मोठी बहीण ही छोट्या भावंडांसाठी आईचं रुप असते. पण एका 9 वर्षाच्या मुलीच्या हत्याकांडच्या खुलासाने पोलीसही हादरले आहेत. या चिमुकलीच्या हत्याकांडमध्ये पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील तपासादरम्यान पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. या प्रकरणात पोलीस जसे जसे खोलात जात होते त्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती.
9 वर्षाच्या चिमुकलीची हत्येमागे तिच्या सख्खा बहिणीचा हात होता. 13 वर्षीय या मुलीने प्रेमप्रकरणातून ही हत्या केली आहे. लहान बहिणीने तिला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिल्यामुळे ती घाबरली होती. 15 मे 2023 ला रात्री लहान बहिणीने मोठ्या बहिणीला बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं होतं. यानंतर त्या दोघांनी तिची हत्या केली.
त्यानंतर त्यांनी या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कोणाला कळू नये म्हणून एका पेटीत बंद करुन ठेवलं होतं. त्यानंतर 16 मे 2023 पासून लहान बहीण बेपत्ता झाल्याचं बनाव रचण्यात आला. पोलिसांनी शोध घेण्यास सुरुवात केली. चार दिवस उलटून गेले होते, मृतदेहाला दुर्गंधी येऊ लागली. पोलिसांची शोध मोहीम जोरात सुरु होती. त्यामुळे ती मुलगी घाबरली आपण पकडल्या जाऊ असं तिला वाटलं. तिने मृतदेहाचे अनेक छोटे छोटे तुकडे करुन अॅसिट टाकून जाळून झुडप्यात फेकून दिले.
त्यानंतर पोलिसांनी 19 मे 2023 ला फॉरेन्सिक टीम आणि श्वान पथकाची मदतीने या हत्याकांडचा उलगडा झाला. त्या चिमुकलीचा मृतदेह घराच्या मागील झुडपात पडलेला आढळला. या हत्येमागे मोठ्या बहिणीचा हात असल्याचं उघड झालं. ज्या दिवशी ही घटना घडली मुलीचे आई वडील लग्नाला गेले होते. घरी कोणी हे पाहून मोठ्या बहिणीने आपल्या प्रियकराला घरी बोलवलं. पण त्या दोघांना नको त्या अवस्थेत लहान बहिणीने पाहिलं. ती आई वडिलांना सांगले म्हणून या भीतीने तिने आपल्या सख्खा लहान बहिणीला मृत्यूचा घाटात उतरवं. (Little sister seen in offensive position with boyfriend The elder sister killed cut her body and burnt with acid crime news )
तिचे गावातीलच एका मुलासोबत अफेअर सुरू होते. त्यातून ही हत्या झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं. या हत्याकांडात बहिणीला मदत करणाऱ्या प्रियकर आणि मावशीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना बिहारमधील हाजीपूरमधील आहे.