Budget Announcement 2024 in Marathi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठल्या. सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळलं या संदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...
23 Jul 2024, 12:41 वाजता
बजेट 2024 मजबूत कमी मजबूर जास्त! गरीब, मध्यम वर्गाला दिलासा; गुंतवणूकदार नाराज
निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पाचं वाचन पूर्ण केल्यानंतर शेअर बाजाराकडून नकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. शेअर बाजारामध्ये मोठी घसरण झाली आहे. सेन्सेक्स एक हजार अंशांनी घसरला; निफ्टी 240 अंकांनी गडगडला आहे.
23 Jul 2024, 12:21 वाजता
नवीन करप्रणालीमध्ये बदल; अर्थमंत्र्यांची घोषणा
नव्या कर प्रणालीमध्ये सुधारणा करण्यात आली असून यामुळे 17500 रुपयांचा फायदा होणार आहे.
0 ते 3 लाख उत्पन्न - 0% कर
3 ते 7 लाख उत्पन्न - 5% कर
7 ते 10 लाख उत्पन्न - 10% कर
10 ते 12 लाख उत्पन्न - 15% कर
12 ते 15 लाख उत्पन्न - 20% कर
15 लाखांहून अधिक उत्पन्न - 30% कर
यामुळे करदात्यांचे 17500 रुपये वाचणार.
23 Jul 2024, 12:15 वाजता
काय स्वस्त काय महाग?
इंपोर्टेड ज्वेलरी स्वस्त होणार, इलेक्ट्रीक वाहनं स्वस्त होणार, एक्स रे मशीन स्वस्त होणार तर प्लास्टिकच्या वस्तू महागणार
23 Jul 2024, 12:15 वाजता
टीडीएससंदर्भात मोठा दिलासा
विलंबाने टीडीएस भरणे यापुढे गुन्हा नाही. आयकर कायदा 1961 ची पुढील सहा महिन्यात समीक्षा होणार. आयकर परतावा भरणं अधिक सुलभ होणार, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली.
23 Jul 2024, 12:11 वाजता
कॅन्सरच्या 3 औषधांवरील कर रद्द
कॅन्सरवरील 3 औषधांना कस्टम ड्यूटीमधून वगळण्यात आल्याची अर्थमंत्र्यांकडून घोषणा; कररचना अधिक सुलभ करण्यावर भर
23 Jul 2024, 12:11 वाजता
मोबाईल फोन्स आणि चार्जर स्वस्त होणार : अर्थमंत्री
23 Jul 2024, 12:06 वाजता
शेतीसाठी 1.52 लाख कोटींची घोषणा
शेती आणि कृषीसंदर्भातील श्रेत्रांसाठी केंद्रीय अर्थमंत्री नीर्मला सीतारमण यांनी 1.52 लाख कोटींची घोषणा केली.
23 Jul 2024, 12:06 वाजता
देशाच्या उत्पन्नात वाढ झाली. वित्तीय तूट 4.9 टक्क्यांवर : अर्थमंत्री
23 Jul 2024, 11:57 वाजता
शेअर बाजार घसरला
अर्थमंत्र्यांचं भाषण सुरु असतानाच शेअर बाजार घसरला, निफ्टीमध्ये 50 अंकांची घसरण
23 Jul 2024, 11:57 वाजता
आंध्र प्रदेशला 15 हजार कोटी
आंध्र प्रदेशला केंद्र सरकारकडून 15 हजार कोटींची मदत जाहीर; अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांची घोषणा