Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget 2024 Nirmala Sitharaman Speech Live Updates: सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं आहे? काय महाग झालं? काय स्वस्त? यासंदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget Announcement 2024 in Marathi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठल्या. सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळलं या संदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

23 Jul 2024, 10:38 वाजता

देशाला विकसित भारत होण्याच्या मार्गावर नेणारा हा अर्थसंकल्प असेल : ज्योतिरादित्य शिंदे

23 Jul 2024, 10:35 वाजता

मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरु

पंतप्रधान नरेंद्र मोदींसहीत महत्त्वाचे नेते संसदेमध्ये दाखल. केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये मांडण्यासाठी त्याला मंजुरी देण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक सुरु झाली आहे.

23 Jul 2024, 09:53 वाजता

महागाई आणि बेरोजगारीपासून दिलासा देतील अशी अपेक्षा : ठाकरे गट

वाढती महागाई आणि बेरोजगारीसंदर्भात नीर्मला सीतारामणजी काहीतरी दिलासा देतील अशी मला अपेक्षा आहे, असं मत उद्धव ठाकरे गटाच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी व्यक्त केलं आहे. हे सरकार पंतप्रधानांच्या 'मन की बात'ऐवजी 'जन की बात' ऐकेल अशी अपेक्षा असल्याचंही चतुर्वेदी म्हणाल्यात.

23 Jul 2024, 09:11 वाजता

अर्थमंत्री निर्मला सीतारामण अर्थमंत्रालयात पोहोचल्या

23 Jul 2024, 08:27 वाजता

Union Budget: आता पूर्वीसारखं रेल्वेचं वेगळं बजेट का मांडलं जात नाही? मोदी सरकारने ते का बंद केलं?

मुख्य अर्थसंकल्पातच रेल्वेसंदर्भातील तरतुदी असल्या तरी देशामध्ये 60 वर्षांहून अधिक काळ रेल्वेचा संपूर्ण वेगळा अर्थसंकल्प मांडला जायचा. हा अर्थसंकल्प आता वेगळा न मांडता एकत्रच मांडतात. 2016 पासून वेगळ्या रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत मोदी सरकारने बंद केली. हे असं का करण्यात आलं? मुळात रेल्वेचा वेगळा अर्थसंकल्प का मांडला जायचा? तो काय कारण सांगून बंद करण्यात आला? जाणून घ्या येथे क्लिक करुन.

23 Jul 2024, 07:17 वाजता

एनडीए सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात काय असू शकतं?

> करदात्यांना दिलासा मिळण्याची शक्यता

> पंतप्रधान किसान सन्मान योजना, पीएम आवास योजना, मनरेगा योजनेच्या निधीत वाढ होण्याची शक्यता

> महिलांसाठी लखपती दीदी योजनेसाठी विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता

> सामाजिक कल्याणाच्या योजनांवर भर दिलं जाण्याची शक्यता

> मेड इंडिया योजनेसाठी भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता

> पर्यावरण रक्षणासाठी विशेष तरतूद

> ग्रीन एनर्जी साठी विशेष प्राधान्य

> एआय तंत्रज्ञानासह शिक्षण क्षेत्रासाठी भरीव तरतूद करण्याची शक्यता...

> संरक्षण क्षेत्रासाठी भरीव निधी

23 Jul 2024, 07:14 वाजता

महाराष्ट्रासाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद?

केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आज 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून 7 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या पहिल्या अर्थमंत्री ठरणार आहेत. या अगोदर 6 वेळा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर होता. निर्मला सितारमण यांचा हा अर्थसंकल्प सितारमण यांच्यासाठी जर ऐतिहासिक विक्रम करणारा असला तरी सर्वसामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरणार का?  हे पाहणं महत्त्वाचं आहे. निर्मला सितारमण यांचा मोदी 3 मधील पहिला अर्थसंकल्प हा मोदी 3 चा रोडमॅप सांगणारा ठरणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह चार राज्यात विधानसभा निवडणूका होणार असल्यामुळं या राज्यांवर अर्थसंकल्पात विशेष तरतूद करण्यासोबतच वित्तीय तुट कमी करण्याचं आव्हान निर्मला सितारमण यांच्यावर असणार आहे.

23 Jul 2024, 07:11 वाजता

निर्मला सीतारमण यांचे अर्थसंकल्पीय दिवसाचे वेळापत्रक- 

सकाळी 8.30 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे, नॉर्थ ब्लॉकसाठी रवाना होतील.

सकाळी 9.00 वाजता : बजेट तयार करणा-या टीमसोबत नॉर्थ ब्लॉक येथे फोटो सेशन

सकाळी 9:10 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या टीमसह राष्ट्रपती भवनात पोहोचणार

सकाळी 9.45 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण संसदेकडे रवाना 

सकाळी 10.00 वाजता : संसदेत प्रवेश करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि अर्थ राज्यमंत्री यांचे फोटोशूट 

सकाळी 10.15 वाजता : संसदेत मंत्रिमंडळाची बैठक 

सकाळी 11.00 वाजता : अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार 

दुपारी 3.30 वाजता : अर्थसंकल्पानंतर निर्मला सीतारमण यांची पत्रकार परिषद 

सायं. 7:30 वाजता : दूरदर्शनवर मुलाखत

23 Jul 2024, 07:09 वाजता

किती वाजता सादर होणार बजेट?

तिसऱ्यांदा मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर आज मोदींच्या तिसऱ्या टर्मचा पहिलाच अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. संपूर्ण देशाचं लक्ष अर्थसंकल्पाकडे लागून राहिलेलं असतानाच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण ठीक 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्यासाठी संसदेमध्ये उभ्या राहतील.