Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget 2024 Nirmala Sitharaman Speech Live Updates: सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं आहे? काय महाग झालं? काय स्वस्त? यासंदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget Announcement 2024 in Marathi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठल्या. सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळलं या संदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

23 Jul 2024, 19:37 वाजता

पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेली दिसते.  गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्र ओरबाडला व मुंबईची लूट केली, पण प्रत्येक बजेटमध्ये महाराष्ट्राची निराशाच केली. महाराष्ट्राने आणखी किती अन्याय सहन करायचा? 
पण दिल्लीचे बूट चाटणारे घटनाबाह्य सरकार बसले आहे तोपर्यंत हा अन्याय सुरूच आहे.  घटनाबाह्य सरकारची किंमत महाराष्ट्राला मोजावी लागत आहे ! अशी टीका  उद्धव ठाकरे यांनी केली आहे. 

23 Jul 2024, 16:31 वाजता

राज्यातील आशा स्वयंसेविका यांच्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय

अशा स्वयंसेविकांना सानुग्रह अनुदनाच्या संदर्भातला महत्वाचा निर्णय
ऑन ड्युटी असताना अपघात होऊन मृत्यू झाला तर तात्काळ दहा लाखांची मदत तर कायमस्वरूपी अपंगत्व आलं तर पाच लाखांची मदत राज्य सरकार करणार
5 एप्रिल 2024 पासून ही योजना लागू
राज्यात एकुण 75 हजार 568 आशा स्वयंसेवीका कार्यरत

23 Jul 2024, 14:18 वाजता

विकासाचा दर मागायच्या दरापेक्षा जास्त  - देवेंद्र फडणवीस

केंद्र सरकारने आज अर्थसंकल्प सादर केला.

मोदी जी यांच्या नेतृत्वात निर्मला सीतारामन यांनी संतुलित अर्थ संकल्प सादर केला

भारताच्या अर्थ व्यवस्थेने 8.2 टक्क्यांनी वाढ दाखवला आहे. भारताच्या तकतीची वाढ झाल्याचे बघायला मिळत आहे

23 Jul 2024, 14:17 वाजता

अन्न, वस्त्र, निवारा देण्याचं काम - एकनाथ शिंदे 

नवरत्न अर्थसंकल्प - एकनाथ शिंदे

23 Jul 2024, 14:15 वाजता

भाजप, महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते? - आदित्य ठाकरे 

भाजपला त्यांचं सरकार वाचवायचं आहे, म्हणून बिहार आणि आंध्र प्रदेशला मोठ्या प्रमाणात अर्थसंकल्पातून वाटा देण्यात आलाय
पण महाराष्ट्राचा काय दोष? आपण सर्वात मोठे करदाते आहोत? आम्ही जे योगदान दिले त्याविरुद्ध आम्हाला काय मिळाले?
अर्थसंकल्पात एकदाही महाराष्ट्राचा उल्लेख होता का?
भाजप, महाराष्ट्राचा एवढा द्वेष आणि अपमान का करते?
असंवैधानिकपणे सरकार स्थापन करून आणि आपल्या राज्यात सर्वात भ्रष्ट राजवट चालवूनही महाराष्ट्राला त्याबदल्यात काहीच मिळत नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे.
मिंधे राजवटीचा भ्रष्टाचार आणि नंतर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष करांच्या माध्यमातून महाराष्ट्राची लूट सुरू आहे

23 Jul 2024, 14:08 वाजता

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिक्रिया 

देशाला न्याय देणारा अर्थसंकल्प 
आर्थिक विकासाला गती मिळणार
समाजाला शक्ती देणारं बजेट 
 

23 Jul 2024, 13:12 वाजता

तृणमूल काँग्रेसचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा निर्मला सीतारमण यांना सवाल

23 Jul 2024, 13:06 वाजता

'टॅक्स आणि मत लुटण्यासाठी महाराष्ट्र, तरतूद मात्र बिहार, आंध्राला'

 

23 Jul 2024, 13:02 वाजता

'महिला आणि तरुणांसाठी हे ड्रिम बजेट' 

महिला आणि तरुणांसाठी हे ड्रिम बजेट असल्याचं केंद्रीय मंत्री किरेन रिज्जू यांनी म्हटलं आहे.

23 Jul 2024, 12:50 वाजता

7000 कोटींचा फटका! नव्या इन्कम टॅक्स स्लॅबचा परिणाम

नव्या कररचनेमुळे सरकारला 37000 कोटींचा फटका बसणार असून त्याचवेळी 30 हजार कोटी मिळणार आहेत. त्यामुळे सरकारला बसणारा एकूण फटका 7000 कोटींचा आहे असं अर्थमंत्र्यांनी नव्या कररचनेची घोषणा केल्यानंतर स्पष्ट केलं.