Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget 2024 Nirmala Sitharaman Speech Live Updates: सर्वांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या असून या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं आहे? काय महाग झालं? काय स्वस्त? यासंदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

Budget 2024 Speech LIVE: पंतप्रधान मोदींनी 'नावडता महाराष्ट्र' ही योजना सुरू केलेय; उद्धव ठाकरेंची टीका

Budget Announcement 2024 in Marathi: नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचं पहिला अर्थसंकल्प आज संसदेमध्ये मांडला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज सलग सातव्यांदा अर्थसंकल्प मांडला. अशी कामगिरी करणाऱ्या पहिल्याच अर्थमंत्री ठल्या. सालाबादप्रमाणे यंदाही सर्वसामान्यांच्या नजरा अर्थसंकल्पाकडे लागल्या होत्या या बजेटमधून सर्वसमान्यांना काय मिळालं. करसवलत, रेल्वे, मूलभूत सुविधा, महिलांसाठी, शेतकऱ्यांसाठी योजना यापैकी नेमकं काय आणि किती प्रमाणात मिळलं या संदर्भातील सर्व अपडेट्स आपण या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. बजेटसंदर्भातील क्षणोक्षणाचे अपडेट्स पाहण्यासाठी हे पेज रिफ्रेश करत राहा...

23 Jul 2024, 11:25 वाजता

पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार : सीतारामण

पहिल्या नोकरीत पहिला पगार सरकार देणार. सर्व क्षेत्रांना ही स्कीम लागू होणार. रोजगारासाठी एकूण तीन योजना जाहीर करत आहोत. नवीन नोकरी करणाऱ्या आणि देणाऱ्या दोघांना लाभ मिळणार आहे. ईपीएफओ रजिस्टर झाल्यानंतर 50 हजार रुपयांचा इंसेन्टिव्ह सरकार देणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण

23 Jul 2024, 11:21 वाजता

शेतकऱ्यांचा डिजीटल सर्वे करणार

6 कोटी शेतकऱ्यांचा डिजिटल सर्व्हे करणार. खरीप पिकांसाठी मार्गदर्शन करणार, असंही केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण यांनी सांगितलं.

23 Jul 2024, 11:20 वाजता

शेतीला चालना देण्यासाठी राज्याबरोबर समन्वय साधणार

विकसित भारताला प्रथम प्राधान्य देणार, तेल उत्पादक बियाणे आणि भाजीपाला उत्पादन वाढीसाठी मदत करणार. राज्य सरकारसोबत समन्वय साधणार : सीतारामण

23 Jul 2024, 11:19 वाजता

1 कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसाठी प्रशिक्षित करणार

पुढील 2 वर्षांमध्ये एक कोटी शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीसंदर्भातील प्रमाणपत्र देऊन प्रशिक्षित करणार : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण

23 Jul 2024, 11:14 वाजता

महागाईचा दर 4 टक्क्यांवर स्थीर राहील : सीतारामण

भारताचा आर्थिक विकास होत आहे. तसेच पुढील काही वर्षांमध्ये हा विकास असाच निरंतर होत राहील. भारतामधील महागाईचा दर 4 टक्के असा स्थीर राहील : केंद्रीय अर्थमंत्री सीतारामण

23 Jul 2024, 11:10 वाजता

गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी या 4 घटकांवर आमचं लक्ष : सीतारामण

23 Jul 2024, 10:52 वाजता

अर्थसंकल्प 2024 : विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेत दाखल

विरोधी पक्षनेते राहुल गांधी संसदेमध्ये दाखल झाले आहेत.

23 Jul 2024, 10:50 वाजता

अर्थसंकल्प 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेमध्ये प्रवेश केला तो क्षण

आज केंद्रीय अर्थसंकल्प सादर होत असून त्याच पार्श्वभूमीवर संसदेच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान मोदी संसदेत दाखल झाले.

23 Jul 2024, 10:50 वाजता

4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी 2 लाख कोटींची तरतूद

4.1 कोटी तरुणांना रोजगार देण्यासाठी 2 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासाठी पाच वर्षांचा पंचसूत्री कार्यक्रम तयार करण्यात आला आहे : निर्मला सीतारामण

23 Jul 2024, 10:45 वाजता

अर्थसंकल्प 2024 च्या प्रती संसदेत दाखल

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या प्रती संसदेच्या आवारात दाखल. या प्रती सर्व खासदारांना वाटल्या जाणार. यात अर्थसंकल्पामधील सर्व तरतूदी सविस्तरपणे नमूद केलेल्या असतात.