मुंबई : देशात कोरोना संकटामुळे लागू असलेल्या लॉकड़ाऊनच्या चौथा टप्पा आता संपत आला आहे. त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन वाढणार का याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न आहे. लॉकडाऊन 4 हा 31 मे रोजी संपणार आहे. त्यामुळे 1 जून रोजी पासून पुन्हा लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. कारण देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय हा घातक ठरु शकतो. हे देखील अनेकांना माहित आहे. अशा परिस्थितीत 1 जूनपासून देशात लॉकडाउन 5 लागू होईल, अशी शक्यता आहे. जी काही मोजक्या शहरांमध्येच असेल. या व्यतिरिक्त लॉकडाउन 5 अधिक दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सरकारकडून लॉकडाऊन 5 बाबत अजून कोणहीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सूत्रांच्या माहितीनुसार, जर लॉकडाऊन 5 लागू करण्यात आला तर खालील गोष्टींमध्ये दिलासा मिळू शकतो.
- धार्मिकस्थळे उघडले जाऊ शकतात. परंतु कोणताही उत्सव साजरा करण्यास परवानगी दिली जाणार नाही, जेणेकरुन गर्दी जमणार नाही.
- या व्यतिरिक्त मास्क, सामाजिक अंतर आवश्यक असणार आहे. कर्नाटक सरकारने एक जूनपासून धार्मिक स्थळ उघडण्यास परवानगी मागितली होती.
- जीम आणि सलून उघडण्याची परवानगी झोननुसार दिली जावू शकते.
- लॉकडाऊन 5 मध्येही शाळा, महाविद्यालये, सिनेमा हॉल, मॉल्स बंद राहतील.
- या व्यतिरिक्त, विवाह आणि अंत्यसंस्कारात ही मर्यादित लोकांना सहभागी होता येईल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या व्यतिरिक्त लॉकडाऊन 5 केवळ काही शहरांमध्येच सख्तीने लागू होऊ शकते. ज्या शहरात कोरोनाचे रुग्ण जास्त आहेत. अशा शहरांमध्ये दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे. म्हणजेच, देशाचा एक मोठा भाग लॉकडाउनपासून मुक्त होऊ शकतो, परंतु काही नियमांचे पालन करणे आवश्यक असेल.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली-मुंबई-बेंगळुरू-पुणे-ठाणे-इंदूर-चेन्नई-अहमदाबाद-जयपूर-सूरत-कोलकाता या शहरांमध्ये येत्या १ जूनपासून लॉकडाऊन सुरूच राहणार आहे. कारण देशातील सुमारे 70 टक्के कोरोनाचे रुग्ण या शहरांमध्येच आढळत आहेत. 1 जून नंतर या शहरांमध्येच कडक नियम लागू राहण्याची शक्यता आहे.