लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेट सफर, पोलिसांकडून 'असं' स्वागत

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

Updated: May 13, 2021, 08:40 AM IST
लॉकडाऊनमध्ये नव्या जोडप्याची बुलेट सफर, पोलिसांकडून 'असं' स्वागत

मुंबई : देशभरात कोरोनाचा विषाणूचा संसर्ग वाढत आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आलेलं आहे. पोलिसांचा कडक पहारा राज्यात पाहायला मिळतोय विनातारण फिरणाऱ्यांची कसून चौकशी होत आहे. दंड आकारला जात आहे. मात्र अशा परिस्थितीत एका नवविवाहित जोडप्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या जोडप्याचं पोलिसांनी असं केलं स्वागत . 

कोरोना काळात लग्नांवर अनेक निर्बंध आले. पण हे निर्बंध तोडून अनेकांनी आपली मंगल कार्य उरकली असं असताना पोलिसांनी एका नव दाम्पत्याला चक्क शाबासकी दिली आहे. या व्हिडिओत रस्त्याने जाणाऱ्या नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी अडवलं आहे. कोरोना नियमांचं पालन करत दुचाकीवरुन घरी निघालेल्या नवविवाहित जोडप्याला चक्क पोलीस शाबासकी देत आहेत.

 कोरोना नियमांचं पालन केल्यामुळे दोघांनीही पोलिसांचे मन जिंकलं आहे. कदाचित याच कारणामुळे पोलिसांनी दोन हार आणून या नव्या जोडप्याचा सत्कार केला आहे. तसेच त्यांनी या नव्या जोडप्याला संसार नव्याने सुरु करण्यासाठी आशीर्वाद म्हणून काही रक्कमसुद्धा दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ पंजाब येथील असून त्याला आयपीएस ऑफिसर दिपांशू काबरा यांनी अपलोड केलं आहे.

या अगोदर आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. एका दुचाकीवर चक्क संपूर्ण कुटूंब सामावलं होतं. एकाच घरातील 6 लोकं एकाच बाईकवरून लग्नाला जात होते. जिथे तुम्ही एका बाईकवरून दोन लोकं जाऊ शकत नाहीत तेथे चक्क 6 लोकं प्रवास करत आहेत. कोरोनाचा धोका वाढत असताना अशा घटना समोर येत आहेत. आयपीएस अधिकारी दिपांशू काबरा यांनी फोटो ट्विट केलं आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन दिलं आहे की, 'लग्नाला जायचं होतं म्हणून मास्क लावला आणि #RoadSefty ला ठेंगा. '