गौतम गंभीर लोकसभेच्या मैदानात, भाजपकडून दिल्ली पूर्वची उमेदवारी

भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे.

Updated: Apr 22, 2019, 10:33 PM IST
गौतम गंभीर लोकसभेच्या मैदानात, भाजपकडून दिल्ली पूर्वची उमेदवारी title=

नवी दिल्ली : भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. भाजपने गंभीरला दिल्ली पूर्वमधून उमेदवारी दिली आहे. तर भाजपच्याच मिनाक्षी लेखी या नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील.

लोकसभा निवडणुकीमध्ये गौतम गंभीरचा सामना काँग्रेसच्या अरविंदर सिंग लवली आणि आम आदमी पक्षाच्या आतिशी यांच्याशी होणार आहे. तर मिनाक्षी लेखी यांच्यासमोर आपचे ब्रजेश गोयल आणि काँग्रेसचे अजय माकन यांचं आव्हान आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळालेला गौतम गंभीरने २२ मार्चला केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद आणि अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

२०१४ लोकसभा निवडणुकीत भाजपच्या महेश गिरी यांनी आपच्या राजमोहन गांधी यांचा पूर्व दिल्ली मतदारसंघातून १,९०,४६३ मतांनी पराभव केला होता.

१२ मे रोजी दिल्लीमध्ये सगळ्या ७ जागांवर लोकसभा निवडणूक होणार आहे. २३ मे रोजी लोकसभेच्या सगळ्या जागांचे निकाल लागणार आहेत.