नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात आपल्यावर ९ वेळा हल्ला झाल्याचं केजरीवाल यांनी म्हटलंय. मुख्यमंत्री झाल्यावर माझ्य़ावर ५ वेळा हल्ले झालेत असं केजरीवाल म्हणाले. आजवर कोणत्याही मुख्यमंत्र्यावर असा हल्ला झाल्याचं उदाहरण नाही. भाजपातर्फे हे सुनियोजीत पद्धतीने घडवून आणलं जात असल्या आरोप केजरीवाल यांनी केलाय. सुरक्षेत एकदा त्रुटी राहू शकते, वारंवार हे शक्य नाही असं केजरीवाल म्हणाले. भाजपा सर्वसामान्य माणसाला राजकारणात पाहू शकत नाही. त्यामुळे माझ्या अगदी शयनगृहापर्यंत छापे मारले जात आहेत. माझ्या नातेवाईकांच्या घरी छापे मारले जात आहेत असं ते म्हणाले. मात्र दिल्लीची जनता याला प्रत्युत्तर देईल असं केजरीवाल म्हणाले.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मोतीनगरच्या कर्मपूरा येथे आम आदमी पार्टीचे लोकसभा उमेदवार बृजेश गोयल यांचा प्रचार करत होते. यावेळी एका तरुणाने त्यांच्या जीपवर चढून केजरीवालांना थप्पड लगावली. सुरेश असे या तरुणाचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे. सुरेशची पत्नी ममताने या थप्पड लगावण्या मागचे कारण सांगितले आहे.
#WATCH: A man slaps Delhi Chief Minister Arvind Kejriwal during his roadshow in Moti Nagar area. (Note: Abusive language) pic.twitter.com/laDndqOSL4
— ANI (@ANI) May 4, 2019
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वाईट वक्तव्य केल्याने तो केजरीवालांवर नाराज होता. यामुळेच त्याने असे मोठे पाऊल उचलल्याचे सुरेशच्या पत्नीने सांगितले.