मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी प्रियंका गांधींना दिलं नवं नाव

योगी फतेहपूरच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते

Updated: May 4, 2019, 09:40 AM IST
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांनी प्रियंका गांधींना दिलं नवं नाव title=

रायबरेली / फतेहपूर : लोकसभा निवडणूक २०१९ (Lok sabha elections 2019) च्या प्रचारादरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांना नवं नाव दिलंय. आपल्या भाषणात प्रियंका गांधींवर टीका करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काँग्रेस गांधींचा उल्लेख 'काँग्रेस की शहजादी' अर्थात 'काँग्रेसची राजकन्या' असा केलाय. उल्लेखनीय म्हणजे, लोकसभा निडवणूक २०१४ च्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणांत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना 'काँग्रेसचा शहजादा' म्हणून संबोधित केलं होतं.

मुख्यमंत्री योगी आदित्यानाथ यांनी शुक्रवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर निशाणा साधला. 'ज्या वयात लहान मुलांना संस्कार शिकवले जायला हवेत, 'काँग्रेस की शहजादी' त्यांना शिव्या द्यायला शिकवतेय... हेच काँग्रेसचं खरं चरित्र आहे' असं म्हणत त्यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केली. योगी फतेहपूरच्या निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. 

उल्लेखनीय म्हणजे, निवडणूक प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांच्यासमोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लहान मुलांकडून घोषणा देण्यात आल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. यावर राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून प्रियंका गांधी यांना नोटीस जारी करण्यात आलीय. 'बच्चे आपापासांत खेळत होते. मी त्यांना भेटण्यासाठी खाली उतरले. तेव्हा त्यांनी घोषणा दिल्या. त्यांनी चुकीच्या पद्धतीनं घोषणा दिल्यानं मीच त्यांना रोखलं... आणि म्हटलं बेटा या घोषणा नाही काही चांगल्या घोषणा द्या... ठीक आहे नोटीस मिळालीय' असं म्हणत आपल्याला नोटीस मिळाल्याचं प्रियंका गांधींनी म्हटलंय.