भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर

 वाराणसीमधून नरेंद्र मोदींना उमेदवारी देण्यात आली आहे

Updated: Mar 21, 2019, 08:33 PM IST
भाजपाची पहिली उमेदवार यादी जाहीर  title=

नवी दिल्ली : भारतीय जनचा पार्टीने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. भाजपाने पत्रकार परिषद घेऊन 182 उमेदवारांची यादी जाहीर केली. यानुसार वाराणसीमधून नरेंद्र मोदींना उमेदवारी देण्यात आली आहे तर गांधीनगरमधून अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. नागपूरमधून नितीन गडकरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रात 16 नावे जाहीर करण्यात आली त्यामधील 14 जण हे विद्यमान खासदार आहेत. 2 ठिकाणी नवे उमेदवार देण्यात आले आहेत. जळगाव, पुणे, ईशान्य मुंबई, दिंडोरी, भंडारा, माढा या जागांची उमेदवारी अद्याप जाहीर करण्यात आली नाही. किरिट सोमय्या, शिरोळे, एस.टी पाटील ही नावे अद्याप गॅसवरच आहेत.

उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वर्ध्यातून रामदास तडसांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. तर रावेरमधून रक्षा खडसेंना उमेदवारी देण्यात आली आहे.

नंदुरबारमधून हिना गावीत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिलीप गांधींऐवजी सुजय विखेंना संधी देण्यात आली आहे. पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे त्यामुळे मी आभारी आहे. याआधी जेवढ्या जागा मिळवल्या त्यापेक्षाही जास्त जागा मिळवेन आणि अधिक काम करेन असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी केले आहे. 

 

नंदुरबार- डॉ. हिना गावीत
नागपूर- नितीन गडकरी 
गडचिरोली- अशोक नेते 
चंद्रपूर- हंसराज अहीर
भिवंडी- कपिल पाटील 
अमेठी - स्मृती इराणी 
उत्तर प्रदेश सहानपूर- राघव लखमदास
मुझ्झफर नगर - डॉ. संजीव कुमार
उत्तर मुंबई- गोपाळ शेट्टी 
लखनऊ- राजनाथ सिंह 
मथुरा- हेमा मालिनी
अकोला- संजय धोत्रे 
उत्तर मध्य मुंबई- पूनम महाजन