'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत?

एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. दरम्यान भाजपा बहुमतासह सत्तेत येणं पाकिस्तानसाठी चिंतेची बाब आहे असं पाकिस्तानचे माजी राजदूत म्हणाले आहेत.   

शिवराज यादव | Updated: Jun 4, 2024, 08:36 AM IST
'नरेंद्र मोदी जिंकले तर भारत हिंदू राष्ट्र....', निकालाआधी काय म्हणाले पाकिस्तानचे माजी राजदूत? title=

LokSabha Election Result: आज मतमोजणी सुरु असून संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान एक्झिट पोलमध्ये व्यक करण्यात आलेल्या अंदाजानुसार 2024 लोकसभा निवडणुकीत भाजपा पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने विजयी होणार आहे. एक्झिट पोलची पाकिस्तानमध्ये फार चर्चा सुरु आहे. पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी एका मुलाखतीत म्हटलं आहे की, जर नरेंद्र मोदी बहुमताने पंतप्रधान झाले तर त्यांना संविधानात संशोधन करण्याची ताकद मिळेल. जर त्यांना ही ताकद मिळाली तर भाजपा भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी प्रयत्न करेल. 

लोकसभेत बहुमत मिळवण्यासाठी कोणत्याही पक्षाला 543 पैकी 272 जागा मिळवण्याची गरज आहे. दरम्यान अनेक एक्झिट पोलमध्ये भाजपाला 250 पेक्षा जास्त जागा मिळतील असे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. 

पाकिस्तानचे माजी परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी जिओ न्यूजमधील एका कार्यक्रमात काश्मीरमधून 370 कलम हटवण्याचा उल्लेख करत म्हटलं की, भाजपा आपल्या निवडणूक प्रचारात जे काही आश्वासन देते ते नंतर पूर्ण करते. ते म्हणाले की, "आपण आजापर्यंत पाहिलं आहे की, नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या प्रचारात जे काय म्हटलं त्याला प्राथमिकता देत पूर्ण केलं. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी कलम 370 चा उल्लेख केला होता. सत्तेत आल्यानंतर त्यांनी लगेच त्याची अंमलबजावणी केली. मला वाटतं यावेळी त्यांची प्राथमिकता भारताला हिंदू राष्ट्र बनवणं आहे. यासाठी त्यांनी फार आधीच काम सुरु केलं आहे".

पुढे ते म्हणाले की, "तसं तर पाकिस्तानला याची काही चिंता असण्याचं कारण नाही. जर तिथे हिंदू बहुसंख्यांक असतील तर खुशाल हिंदू राष्ट्र बनवावं. आम्हाला काही फरक पडत नाही. पण ते मुस्लीम आणि इतर धर्माच्या लोकांसाठी समस्या निर्माण कर आहेत. हिंदू राष्ट्र झाल्यानंतर या समस्या वाढतील".