ऑफीसमध्ये जडलं प्रेम, नंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप

लग्नाच्या बहाण्याने अनेक वेळा तिच्यावर बलात्कार

Updated: Nov 23, 2021, 10:21 PM IST
ऑफीसमध्ये जडलं प्रेम, नंतर लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा तरुणीचा आरोप title=

नवी दिल्ली : नोएडातील सेक्टर 20 पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीने तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. घटनेची नोंद करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मीडिया प्रभारी पोलीस आयुक्त आलोक सिंह यांनी सांगितले की, नोएडाच्या एका कंपनीत काम करणाऱ्या एका तरुणीने आरोप केला आहे की, 2014 मध्ये कंपनीतील अजय शर्मा नावाच्या तरुणाशी मैत्री झाली होती. तरुणांने तिच्यावर प्रेम केले आणि लग्नाच्या बहाण्याने नोएडाच्या सेक्टर 20 आणि सेक्टर 28 मध्ये अनेक वेळा तिच्यावर बलात्कार केला.

त्यांनी सांगितले की, पीडितेने याप्रकरणी दिल्लीतील संगम विहार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तेथून हे प्रकरण नोएडा येथे वर्ग करण्यात आले आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे त्यांनी सांगितले.