Love Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण

लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात. पण आजच्या जमान्यात त्या गाठी तुटायला क्षुल्लक वाद आणि कारणही पुरेसं ठरत आहे. यामुळेच अलिकडे घटस्फोटांचे प्रमाण वाढले आहे. त्यातचे प्रेम विवाह करणाऱ्याचे सर्वाधिक घटस्फोट होत आहेत.   

वनिता कांबळे | Updated: May 17, 2023, 08:52 PM IST
Love Marriage करणा-यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचे निरीक्षण title=

Love Marriage Divorce Rate : ज्याच्यावर प्रेम करतो त्याच्यासोबत संपूर्ण आयुष्य व्यतीत करावं अस प्रत्येक जोडप्याला वाटते. प्रेमाचा शेवट लग्नात होतो. मात्र, हेच प्रेम विवाह अयशस्वी ठरत असल्याचे दिसत आहे. कारण Love Marriage बाबत धक्कादायक समोर आली आहे. प्रेमविवाह करणा-यांमध्ये घटस्फोटांचं प्रमाण वाढत असल्याची बाब समोर आली आहे.  सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी याबाबतचे निरीक्षण नोंदवले आहे. 

लव मॅरेजवाल्यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात

अलिकडच्या काळात लव मॅरेजवाल्यांचे सर्वाधिक घटस्फोट होतात, असं निरीक्षण सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी नोंदवले आहे. एका वैवाहिक खटल्याची सुनावणी करताना न्या. बी. आर. गवई यांनी ही टिप्पणी केली. संबंधित वैवाहिक खटला मध्यस्थाकडे सोपवण्याचा आदेश तूर्तास सुप्रीम कोर्टानं दिला आहे.

घटस्फोटासंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

घटस्फोटासंदर्भात सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी केली होती. जिथे लग्न वाचवायला वाव नसतो, अशा वेळी जोडपे लगेच वेगळे होऊ शकतात. दोघांना सोबत रहायचं नसेल आणि कोणत्याही परिस्थितीत लग्न मोडणार असेल तर मग तशी परवानगी देऊन लग्न मोडू शकते. 

सहा महिन्यात घटस्फोट

सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणीमुळे आता घटस्फोटासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागणार नाही. वेगळे होण्याची इच्छा असलेल्या जोडप्याला सहा महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार नाही. घटनेच्या कलम 143 नुसार विशेष अधिकाराचा वापर करू शकतात. आणि परस्पर संमतीने घटस्फोटासाठी 6 महिन्यांचा अनिवार्य प्रतीक्षा कालावधी अटींनुसार सोडविला जाऊ शकतो. असं सुप्रीम कोर्टानं म्हटल आहे. सध्या घटस्फोट घ्यायचा झाल्यास फॅमिली कोर्टाचे दरवाजे ठोठवावे लागतात... तिथं एवढे खटले प्रलंबित आहेत की, घटस्फोटासाठी दोन ते अगदी पाच-सहा वर्षं वाट पाहावी लागते. यामुळं विवाहित स्त्री-पुरूषांच्या आयुष्यातील मोलाची वर्षं कोर्टकज्जांमध्ये वाया जातात... त्यामुळंच झटपट घटस्फोटासाठी 6 महिन्यांचा कालावधी कमी करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे. 

मोबाईलमुळे घटस्फोट

भंडा-यात वर्षभरात तब्बल 328 जोडप्यांनी घटस्फोट घेतल्याचे वृत्त प्रसारित झाले होते. विशेष म्हणजे यातील बहुतांश जोडप्यांचा घटस्फोट मोबाईलमुळे झालाय. याचवेळी र दुसरीकडे  117 जोडप्यांनी पुन्हा संसार उभारलाय. भरोसा सेलनं उत्तम कामगिरी करत या जोडप्यांचं मतपरिवर्तन केलं. वर्षभरात घटस्फोटासाठी जवळपास 404 अर्ज आले होते. घटस्फोटित जोडप्यांची संख्या पाहता, अतिमोबाईल वेड संसारासाठी किती घातक ठरतंय हे अधोरेखित झाले.