Paytmची खास ऑफर, फुकटात मिळणार LPG सिलिंडर

LPG सिलिंडर मोफत मिळणार हे ऐकूनच केवढा आनंद होतो. मात्र या सेवेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल तर तुमच्याकडे केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. 

Updated: Jan 29, 2021, 07:48 PM IST
Paytmची खास ऑफर, फुकटात मिळणार LPG सिलिंडर title=

मुंबई: LPG सिलिंडर मोफत मिळणार हे ऐकूनच केवढा आनंद होतो. मात्र या सेवेचा लाभ आतापर्यंत घेतला नसेल तर तुमच्याकडे केवळ 2 दिवसच शिल्लक आहेत. त्यानंतर मात्र मोफत सिलिंडर मिळणार नाही. हा सिलिंडर मोफत कसा घ्यायचा याबाबत आज आम्ही माहिती देणार आहोत.

Paytmच्या नवीन योजनेंतर्गत LPG सिलिंडरचे ऑनलाइन बुकिंग केल्यास 700 रुपयांपर्यंतचे कॅशबॅक मिळत आहे. याचा अर्थ Paytmच्या माध्यमातून तुम्हाला LPG गॅस सिलिंडर विनामूल्य मिळू शकतात. ही ऑफर फक्त 31 जानेवारीपर्यंत युझर्ससाठी उपलब्ध असणार आहे.

Paytmची कॅशबॅक ऑफर नेमकी काय?
पेटीएमच्या नव्या योजनेत एलपीजी सिलिंडरच्या बुकिंगवर 700 रुपयांपर्यंतची कॅशबॅक ऑफर आहे. याचा अर्थ आपला एलपीजी सिलिंडर पूर्णपणे विनामूल्य असेल, कारण सबसिडीनंतर रिफिल सिलिंडरची किंमत सुमारे 700-750 रुपये असते. 

जेव्हा आपण एलपीजी गॅस सिलिंडरसाठी बुक करताना पैसे देता तेव्हा आपल्याला अ‍ॅपवरच स्क्रॅच कार्ड मिळणार आहे. एचपी, इंडियन किंवा भारत गॅसकडून गॅस बुकिंग करणाऱ्यांना या सुविधेचा लाभ घेता येईल असा दावा करण्यात आला आहे. कार्ड स्क्रॅच केल्यानंतर 24 तासांत तुमच्या खात्यात पैसे जमा होतील असं Paytm कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.

ही ऑफर केवळ 500 रुपयांहून अधिक किंमतीचा LPG सिलिंडर बुकिंग करणाऱ्यांसाठीच उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ ग्राहकांना 31 जानेवारीपर्यंत घेता येणार आहे. त्यानंतर ही स्कीम बंद होणार असल्य़ाची माहिती मिळाली आहे. तर या योजनेचा लाभ ग्राहकाला एकदाच घेता येणार आहे. 
हे विसरू नका..
Paytmवर मिळणाऱ्या स्क्रॅचकार्डची वैधता केवळ 7 दिवस आहे. त्यातही 31 तारीख ही योजनेचा लाभ घेण्यासाठी शेवटची आहे. त्यामुळे 7 दिवसांनंतर जर तुम्ही कार्ड स्क्रॅच केलं तर त्याचा लाभ मिळणार नाही.