नवी दिल्ली : छत्तीसगडमधील पहिल्या टप्प्यातील अठरा विधासभा मतदारसंघासाठी आज मतदान सुरू आहे. यात बहुतांश मतदारसंघ नक्षलग्रस्त भागातील असल्याने सुरक्षेची प्रचंड काळजी घेण्यात आलीय. बस्तरच्या १२ मतदारसंघात एक लाखांपेक्षा जास्त जवान तैनात करण्यात आले आहेत. असं असताना देखील मतदानाच्या आधी म्हणजे सकाळी साडे पाच वाजता नक्षल्यांनी दंतेवाडाच्या कातेकल्यान ब्लॉकच्या तुमकपाल कॅंपजवळ IED ब्लास्ट केला.
सुरक्षा रक्षकांना निशाणा करण्याच्या हेतूने हा ब्लास्ट करण्यात आला.
या ब्लास्टमध्ये सुरक्षा दल आणि पोलिंग व्यवस्थेचे कोणतेही नुकसान झाले नाही.
ब्लास्टनंतर निवडणुक कर्मचाऱ्यांना नयानर पोलिंग बुथवर सुरक्षित पोहोचविण्यात आलं.
Dantewada: 1-2 kilograms of Improvised Explosive Device (IED) blasted by naxals near Tumakpal camp in Katekalyan block. Voting is underway for 10 out of 18 seats in the first phase of #ChhattisgarhAssemblyElection2018.
— ANI (@ANI) November 12, 2018
आज होणाऱ्या लढतींमध्ये मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या राजनंदगाव मतदारसंघाचाही समावेश आहे.
#Chhattisgarh: Voting begins for 10 out of 18 seats in the first phase of #ChhattisgarhAssemblyElection2018 pic.twitter.com/n3mXyn4Nhd
— ANI (@ANI) November 12, 2018
डॉ. रमण सिंहांसमोर माजी पंतप्रधान आणि भाजपाचे वरिष्ठ नेते दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतणी करुणा शुक्ला काँग्रेसकडून उमेदवार आहेत.
आज होणाऱ्या मतदानातील नक्षलग्रस्त भागात सकाळी ७ ते ३ वाजेपर्यंतच मतदारांना आपला हक्क बजावता येणार आहे.
गेल्या दोन विधानसभांचा विचार करता नक्षलग्रस्त भागात सत्ताधारी भाजपाचा जनाधार सातत्यानं कमी होत गेला आहे.