निवडणुकांच्या तयारीसाठी पंतप्रधान 10 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर

.पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय.

Updated: Nov 12, 2018, 08:31 AM IST
निवडणुकांच्या तयारीसाठी पंतप्रधान 10 दिवसांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावर  title=

मध्य प्रदेश : ५ राज्यातल्या निवडणुका विधानसभांची रणधुमाळीनं आता जोर धरलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मध्यप्रदेशातल्या प्रचाराचा कार्यक्रम निश्चित झालाय. येत्या १६ तारखेपासून २५ तारखेपर्यंतच्या काळात मध्यप्रदेशातल्या विविध जिल्ह्यात मोदी प्रचार सभा घेतील. २८ तारखेला मध्यप्रदेशात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 

पंतप्रधानांचा कार्यक्रम 

जाहीर कार्यक्रमानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ नोव्हेंबर ग्वाल्हेर आणि शहाडोलमध्ये तर १८ नोव्हेंबरला मोदी छिंदवाडा आणि इंदूरमध्ये जाहीर सभा घेतील.

२० नोव्हेंबरला झाबुवा आणि रिवा जिल्ह्याच्या शहारांमध्ये मोदींच्या सभा आयोजित करण्यात आल्या आहेत.

२३ नोव्हेंबरला मंदसौर आणि छतरपूरमध्ये तर २५ नोव्हेंबरला मोदींच्या दोन सभा होतील.

त्यातली पहिली सभा विदिशा इथे तर दुसरी सभा जबलपूरमध्ये होणार आहे.