मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने पतीने दिला घटस्फोट...

आपल्या तान्ह्या मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने एका विवाहितेला पतीने घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 7, 2017, 05:49 PM IST
मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने पतीने दिला घटस्फोट...  title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

जयपूर : आपल्या तान्ह्या मुलीचा बळी देण्यास नकार दिल्याने एका विवाहितेला पतीने घटस्फोट दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थानमधील अलवर जिह्ल्यात ही घटना घडली आहे. या महिलेचा विवाह २०१३ मध्ये इम्रानशी झाला होता. 

लग्नानंतर २०१५ मध्ये त्यांना पहिली मुलगी झाली. मात्र पतीला मुलगा हवा असल्याने तो जादू टोणा करण्याचा नाद लागला. दुसरीही मुलगी झाल्याने त्याने पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्याचबरोबर तो पैशाची मागणी देखील करू लागला. मुलगा हवा या हव्यासापोटी त्याने गॅरी एका मांत्रिकाला बोलवले आणि त्याच्या सांगण्यावरून ८ महिन्याच्या लहान मुलीला बळी देऊ लागला. याला पत्नीने विरोध केला. तिच्या ओरडण्याने शेजारी जमले.  

शेजारी जमल्याने गर्दी झाली. हे पाहून पती आणि तंत्रिकाने तेथून पळ काढला. दुसऱ्या दिवशी पती आपल्या दोन भाऊ व कुटुंबियांसमवेत परत आला. एक दिवस त्याने पत्नीला खोलीत उलटे लटकवले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी खाली उतरवून तिला मारहाण केली. मग काही दिवसांनी त्याने मुलींसह पत्नीला माहेरी सोडले आणि तीन वेळा तलाक बोलून परतला. त्यानंतर पिडीत महिलेच्या वडिलांनी वकिलांच्या मदतीने इम्रानविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.