कुत्र्यासमोर विचित्र डान्स करणं तरुणाला पडलं महागात, व्हिडीओ

हा तरुण इतका विचित्र डान्स करत होता की कुत्र्याला त्याचा डान्स न आवडल्याने त्याने काय केलं एकदा हा व्हिडीओ पाहाच

Updated: Sep 6, 2021, 10:13 PM IST
कुत्र्यासमोर विचित्र डान्स करणं तरुणाला पडलं महागात, व्हिडीओ

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वी गायीसमोर नाचणाऱ्या महिलेचा एक व्हिडीओ समोर आला होता. गायीला या महिलेचा वाईट डान्स आवडला नाही म्हणून तिने थेट शिंगाने उडवून लावल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. तशाच प्रकारचा अजून एक व्हिडीओ समोर आला आहे. तरुणाने कुत्र्यासमोर डान्स केला. मात्र हा डान्स इतका वाईट होता की कुत्र्यानेच त्याला आयुष्यभराची अद्दल घडवली आहे. 

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की तरुण अत्यंत वाईट पद्धतीनं डान्स करत आहे. त्याच्या मागे कुत्रा त्याचा डान्स पाहात आहे. कुत्रा त्याला पाहातोय हे लक्षात येऊनही तो त्याचा वाईट डान्स थांबवत नाही. उलट अजून वाईट पद्धतीनं डान्स सुरू करतो. कुत्र्याला ते आवडत नाही. कुत्रा त्याला चांगलीच अद्दल घडवतो. 

कुत्र्याने रागाच्या भरात थेट तरुणाच्या पार्श्वभागाचा चावा घेण्याचाच प्रयत्न केला आहे. तरुणाला घडलेली ही अद्दल तो कधीही विसरू शकणार नाही. यापुढे कुत्र्यासमोर नाचताना तो नक्की विचार करेल आणि हा प्रकार त्याला आठवल्याशिवाय राहणार नाही. 

सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी प्राण्यांसोबत स्टंट केले जातात. प्राण्यांसोबतचे व्हिडीओ शेअर केले जातात. मात्र असे स्टंट किंवा अशाप्रकारे डान्स करताना कधीतरी फजितीही होते. तीच फजिती या तरुणाची झाली. कुत्र्यासमोर हा तरुण विचित्र पद्धतीने नाचत होता. त्याचा डान्स पाहून कुत्रा गोंधळून जातो आणि त्याला चावतो. त्यामुळे असे प्रकार किंवा स्टंट तुमच्यासाठी जीवघेणे ठरू शकतात ते करणं टाळा. 

हा व्हिडीओ कोणत्या परिसरातील आहे याची अद्याप कोणतीही माहिती मिळू शकली नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झी 24 तास या व्हिडीओची पुष्टी करत नाही.