Abhijeet Kelkar On Samruddhi Mahamarg : 'अमेरिका श्रीमंत आहे म्हणून येथील रस्ते चांगले नाहीत. तर, अमेरिका श्रीमंत आहे कारण तिथे चांगले रस्ते आहेत.' अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडी यांचे हे वाक्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आपल्या भाषणात नेहमी सांगतात. ज्या प्रदेशातील रस्त्यांचे जाळे भक्कम आहे, तेथील विकास झपाट्याने झाल्याचे पाहायला मिळतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना देण्यासाठी आणि विकासापासून दूर राहिलेल्या भागाला समृद्धीच्या मार्गावर आणण्यासाठी मुंबई ते नागपूर असा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग (mumbai to nagpur samruddhi mahamarg) उभारण्यात येत आहे. या महामार्गाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्प्यातील प्रवासी वाहतूकीचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या हस्ते आज 11 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथून करण्यात येत आहे. हा महामार्ग खुला झाल्यानंतर नागपूर ते शिर्डी अंतर 10 तासांऐवजी 5 तासांत कापता येणार आहे. याबाबत मराठी अभिनेता अभिजीत केळकरनं संताप व्यक्त केला आहे.
समृद्धी महामार्गावरून अभिजीत केळकरनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. 'आमचं कोकणही ‘समृद्धी’ची वाट बघतंय…गेली 12 वर्षे' असं त्यानं पोस्टमध्ये म्हटलं आहे. यासोबतच रागावल्याचे इमोजी शेअर करत अभिजीतनं संताप व्यक्त केला आहे. अभिजीतच्या पोस्टवर नेटकरी त्यांची प्रतिक्रिया देत आहेत. अभिजीत हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतो. अभिजीत सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत परखडपणे मत मांडतो.
हेही वाचा : 'असं वाटतं की आपण न्यूड आहोत...,' Dating Life विषयी प्रश्नांवर Nargis Fakhri संतप्त
राज्याच्या या योगदानात अर्थातच मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद आणि नागपूर यासारख्या मोजक्या शहरांचा हातभार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व कोकणातील काही भाग विकासापासून मागे पडले आहेत. मागासलेल्या भागांच्या विकासासाठी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग महाराष्ट्राच्या विकासाचा महामार्ग ठरणार आहे. 701 किमी लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या उभारणीसाठी आवश्यक 8311 हेक्टर जमिनीची भूसंपादनाची प्रक्रिया अवद्या आठ महिन्यात पार पडली. समृध्दी महामार्गाचा डिझाइन स्पीड 150 कि.मी. / प्रति तास आहे. या द्रुतगती मार्गावरून 100 कि.मी. / प्रतितास वेगाने वाहने गेल्यावर नागपूरहून मुंबईपर्यंत यायला अवघे सहा ते आठ तास लागतील. त्यामुळे साहजिकच औद्योगिक तसेच कृषी मालाची वाहतूक विनाअडथळा आणि वेगवान पद्धतीने होऊ शकणार आहे.
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम, बुलडाणा, जालना, औरंगाबाद, अहमदनगर, नाशिक आणि ठाणे या दहा जिल्ह्यांमधून जाणार आहे. तर इंटरचेंजेसच्या माध्यमातून 14 जिल्हे समृद्धी महामार्गाशी अप्रत्यक्षपणे जोडले जाणार आहेत. त्यामुळे राज्यातील 36 पैकी 24 जिल्ह्यांना समृद्धी महामार्गाचा लाभ होणार आहे, हे विशेष. त्यातही मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विशेष लाभ होणार आहे. उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत अविकसित राहिलेले हे दोन भूप्रदेश महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाच्या प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.