नवी दिल्ली : यावर्षी लग्न सोहळ्यावर जीएसटी आणि नोटबंदीचा प्रभाव पाहायला मिळणार आहे. विवाहसोहळ्यांचा सिजन नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहेत. लग्न हॉल / गार्डन बुकिंग, फोटोग्राफी यावर 10 ते 15 टक्के प्रभाव पडणार आहे.
नोटबंदी आणि जीएसटीमुळे दागिने आणि अॅक्सेसरीजवर जास्त खर्च होऊ शकतो. लग्न हॉलसाठी देखील नेहमीपेक्षा जास्त खर्च करावा लागू शकतो. जीएसटीमुळे बऱ्याच वस्तू आणि सेवांच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे, लग्नाचा बजेट यावर्षी वाढणार आहे. लग्नाशी संबधित अनेक वस्तूंवर जीएसटीचा दर 18 ते 28 टक्के आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी याचे दर कमी होते.
जीएसटीपूर्वी अशा अनेक सेवांवर कर नाही द्यावा लागत होता. अनेक कामं हे अनोंदणीकृत बिलांवर होत होते. 500 रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या फुटवेअरवर 18 टक्के जीएसटी आहे. सोने आणि हिरे-दागिन्यांवर कर 1.6% वरून 3 टक्क्यांनी वाढला आहे. फाईव्हस्टार हॉटेल्स बुकिंगवर 28 टक्के जीएसटी लागणार आहे. इव्हेंट मॅनेजमेंट सेवेवर देखील 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. मॅरेज हॉलची बुकिंग किंवा गार्डन बुकिंग सारख्या सेवांवर देखील 18 टक्के जीएसटी असेल. त्यामुळे लग्नाचं बजेट आता वाढणार आहे.