नागालॅंडमध्ये ३८ टक्के तर मेघालयमध्ये २० टक्के मतदान

 मेघालय आणि नागालँडमध्ये आज विधानसभेच्या निवडणूकीचं मतदान सुरु झालंय. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 27, 2018, 01:41 PM IST
नागालॅंडमध्ये ३८ टक्के तर मेघालयमध्ये २० टक्के मतदान title=

शिलांग / कोहिमा : मेघालय आणि नागालँडमध्ये आज विधानसभेच्या निवडणूकीचं मतदान सुरु झालंय. सकाळी ११ वाजेपर्यंत नागालॅंडमध्ये ३८ आणि मेघालयमध्ये २० टक्के मतदान झाल्याचे नोंद झालेय.

सकाळी सात ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया सुरू राहिल. नागालँडमधील काही दुर्गम भागात मतदान 3 वाजेपर्यंतच घेण्यात येईल. दोन्ही राज्यात प्रत्येकी ६० विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यापैकी प्रत्येकी ५९  ठिकाणी मतदान घेण्यात येतंय. सकाळपासून दोन्ही राज्यात मतदारांच्या रांगा बघयाला मिळत आहेत. 

त्रिपुरामध्ये १८ फेब्रुवारीला झालेल्या निवडणुकीत ९०  टक्के मतदारांनी हक्क बजावला होता. मेघालयमधील विल्यमनगर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराची हत्या झाल्यानं इथलं मतदान पुढे ढकलण्यात आलं आहे. त

नागालँडमध्ये उत्तर अंगमी मतदारसंघात NDPP या स्थानिक पक्षाचा उमेदवार बिनविरोध निवडून आलाय.  आजच्या मतदानानंतर येत्या ३ मार्चला मतमोजणी होणार आहे. याआधी १८ फेब्रुवारीला त्रिपुरामध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. तिथली मतमोजणीही ३ मार्चला होणार आहे.