सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्या

तो एक फोन येतो आणि तुम्हाला सांगितलं जातंय की, तुमचा नंबर ब्लॉक केला जाणार आहे. काय आहे हे प्रकरण जाणून घ्या   

नेहा चौधरी | Updated: Oct 14, 2024, 10:49 AM IST
सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक! तुम्हाला असा कॉल आला का? काय आहे सत्य जाणून घ्या
Mobile number block from the government Have you received such a call Know what the truth

भारतात आज असा एकही व्यक्ती नाही ज्याच्याकडे मोबाईल नाही. अगदी वृद्ध व्यक्तींपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांकडे मोबाईल असतो. मोबाईल जणू काही आपल्या आयुष्यातील एक अविभाज अंग झालाय. अशातच सध्या लोकांच्या फोनवर एक कॉल येतो. ज्यामध्ये सरकारकडून युजर्सचे मोबाईल नंबर ब्लॉक केले जात आहे, असं अनेक मोबाईल यूजर्सना कॉल जात आहेत. जर तुम्हाला असा कॉल आला तर तुम्ही सावधगिरी बाळगा. काय आङे या कॉलमागील सत्य आणि नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात. (Mobile number block from the government Have you received such a call Know what the truth )

Add Zee News as a Preferred Source

सरकारकडून मोबाईल नंबर ब्लॉक?

सायबर ठग टेलिकॉम रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी म्हणजेच ट्रायच्या नावाने लोकांना असे अनेक फोन जात आहेत. हा एक फसवणुकीचा कॉल असल्याचा सांगण्यात आलंय. या कॉलद्वारे यूजर्सला नंबर बंद करण्याची धमकी दिली जातेय. 

भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केलंय. लोकांना सावध करत, PIB ने ट्विट केलंय की, 'तुम्हाला देखील ट्रायकडून कॉल केला जात आहे की फोनच्या असामान्य वर्तनामुळे तुमचा मोबाइल नंबर लवकरच ब्लॉक केला जाईल?'

सरकारच्या दावात किती तथ्य

पीआयबीने हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं म्हटलंय. दूरसंचार नियामक TRAI ग्राहकांना नंबर डिस्कनेक्शनबाबत कॉल किंवा संदेश पाठवत नाही.

दिशाभूल करणाऱ्या बातम्यांबाबत इथे करा तक्रार 

आम्ही तुम्हाला सांगतो की सरकारशी संबंधित कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी तुम्ही PIB Fact Check ची मदत देखील घेऊ शकता. कोणतीही व्यक्ती 8799711259 या WhatsApp क्रमांकावर PIB फॅक्ट चेकला दिशाभूल करणाऱ्या बातमीचा स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा URL पाठवू शकते किंवा factcheck@pib.gov.in वर मेल करू शकते.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More