VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू

पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 9, 2018, 07:29 PM IST
VIDEO : केरळात पावसाचा कहर; रस्ते-रेल्वे मार्ग वाहून गेलेत, २० जणांचा मृत्यू title=

कोच्ची : दिल्लीतसह उत्तर भारतात काही भागात पाऊस शांत झालाय. महाराष्ट्रात अधूनमधून पाऊस कोसळत आहे. मात्र, दक्षिण भारतात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. केरळमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झालाय. जोरदार पावसामुळे रस्ते आणि रेल्वे रुळाखालील जमीन खचली असून काही ठिकाणी रस्ते वाहून गेलेत. त्यामुळे याचा परिणाम दळवळणावर झालाय. पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेय. त्यामुळे इटुक्की धरणाचा दरवाजा उघडण्यात आलाय. धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. राज्य इलेक्ट्रिक बोर्डने रेड अलर्ट जारी केले आहे. धरणात २४०० फुट पाणी भरले आहे.

Kerala

राज्य सरकारने एनडीआरएफच्या ६ अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली आहे. सावधगिरी म्हणून कोचीन आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सूचित केले आहे की, २.३० वाजता येणाऱ्या विमानांना अन्यत्र वळविण्यात आले आहे. त्यामुळे बाहेर जाणाऱ्या विमानांवर याचा परिणाम होणार नाही. 

Kerala

केरळचे मुख्यमंत्री पिनायरी विजयन यांनी सांगितले की, पावसामुळे इडुक्कीमध्ये ११, मलप्पुरममध्ये ६ तर कोझिकोडमध्ये दोन आणि वायनाड येथे एका व्यक्तीचा मृत्यू झालाय. तसेच पुढीक काळात पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाला सर्तकतेचा इशारा देण्यात आलाय. अधिक सावधगिरी बाळगण्यामुळे पुणमदा झील वर आगामी नेहरू व्होट रेस स्थगित करण्याचे ठरविले आहे. आयोजक यांनी नवीन तारखेची घोषणा नंतर करण्यात येणार आहे.