नवी दिल्ली : देशात 8 जून रोजी सोमवारी कोरोना व्हायरसच्या रुग्णांची संख्या अडीच लाखांच्यावर गेली आहे. जूनच्या पहिल्याच आठवड्यात कोरोनाचे 60 हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या 24 तासांत भारतात कोरोना संसर्गाचे 9983 नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळे आता देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2 लाख 56 हजार 611 इतकी झाली आहे. तर कोरोनामुळे 7 हजार 135 जणांचा बळी गेला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात 1 लाख 25 हजार 381 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 1 लाख 24 हजार 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
रविवारी एका दिवसांत देशात 206 जणांचा मृत्यू झाला. त्यापैकी महाराष्ट्रात 91, गुजरात 30, 18 तमिळनाडू, 18 उत्तरप्रदेश, 13 मध्यप्रदेश, 13 पश्चिम बंगाल, 9 राजस्थान, 4 हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 2 मृत्यू झाले आहेत. तर ओडिशा आणि पंजाबमध्ये एक-एक मृत्यू झाला आहे.
देशात कोरोनामुळे आतापर्यंत 7135 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा सर्वाधिक आकडा महाराष्ट्रात आहे. एकट्या महाराष्ट्रात 3060 जण दगावले आहेत. गुजरातमध्ये 1249, दिल्ली 761, मध्य प्रदेश 412, पश्चिम बंगाल 396, उत्तर प्रदेश 275, तमिळनाडू 269, राजस्थान 240, तेलंगाना 123, आंध्र प्रदेश 75, कर्नाटक 61 आणि पंजाबमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये 41 जण दगावले आहेत. तर बिहारमध्ये 30 जणांचा बळी गेला आहे. हरियाणा 28, केरळ 15, उत्तराखंड 13, ओडिशा 9, झारखंड 7, हिमाचल प्रदेश आणि चंडीगड 5, आसाम आणि छत्तीसगढ 4, मेघालय आणि लडाखमध्ये प्रत्येकी एक बळी गेला आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, मृत्यू होणाऱ्यांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक रुग्ण इतर आजारांनी पिडित होते.