मुंबई : सध्या उन्हाळा सुरु आहे आणि आंबा हा उन्हाळ्यात येतो. त्यामुळे बरेचसे लोक याकाळात मनभरुन आंबा खातात. आंबा हा चवीला गोड आणि रसाळ असतो ज्यामुळे त्याला खाण्याचा मोह कोणीही रोखू शकत नाही. आंब्याचे अनेक प्रकार बाजारात विक्रीला येतात. त्यांपैकी दसरी, चौसा आणि लंगडा आंब्याचे नाव तुम्ही सर्वांनी ऐकले असेल. परंतु या सगळ्यात सर्वांना खायला आवडतो तो म्हणजे हापूस. जो इतर आंब्यांपेक्षा किंमतीने थोडा महाग असतो.
परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एक आंब्याबद्दल सांगणार आहोत. ज्याची फक्त किंमत ऐकूनच तुम्हाला आश्चर्य वाटेल.
आज आम्ही तुम्हाला ज्या आंब्याबद्दल सांगणार आहोत, तो जपानमध्ये आढळतो. याशिवाय हा आंबा भारतातही आढळतो.
जपानमध्ये आढळणाऱ्या जगातील सर्वात महागड्या आंब्याचे नाव 'तैयो नो तामांगो' आहे. हे जपानमधील मियाझाकी येथे आढळते, तर बिहारमधील पुनिया आणि मध्य प्रदेशातील जबलपूर येथेही हा आंबा आढळते.
हा आंबा भारतात मिळत असला, तरी सामान्य माणूस हा आंबा विकत घेण्याचे स्वप्नही पाहू शकत नाही. कारण त्याती किंमत इतकी आहे की, किंमतीत एक दुचाकी वाहन नक्की येईल.
आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत 2.7 लाख रुपये प्रति किलो आहे. जे खरोखरंच खूप जास्त आहे.
हा आंबा सामान्यतः मियाझाकी, क्युशू प्रांत, जपानमध्ये पिकवला जातो. तर मध्य प्रदेशातील जबलपूरमध्येही त्याची काही झाडे आहेत आणि एक झाड बिहारमधील पूर्णियामध्ये आहे.
तैयो नो तामांगो जातीच्या आंब्याची भारतातील किंमत 21 हजार आहे. पूर्णियामध्ये या जातीचे एक झाड आहे, जे 25 वर्षांपासून अस्तित्वात आहे.
या आंब्याच्या चवीबद्दल बोलायचे झाले, तर हा आंबा चवीला गोड तसेच नारळा सारखा लागतो, एवढेच काय तर या आंब्याला अननसाची चवही आहे.
जपानमध्ये तैयो नो तामांगो आंब्याची लागवड ७० आणि ८० च्या दशकात सुरू झाली. जगातील सर्वात महागडा आंबा हा बराच काळ उष्ण वातावरण, सूर्यप्रकाश आणि पाऊस पडल्यानंतर पिकतो.