भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. चौहान यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली. त्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. (Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chuouhan has tested positive for coronavirus COVID-19) मुख्यमंत्र्यांनी समाजमाध्यमांवर ही माहीती शेअर केली आहे. मी कोरोना चाचणी केली. ही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी क्वारंटाईन झालेलो आहे, असे त्यांनी ट्टिट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी तात्काळ क्वारंटाईन व्हावे, असे आवाहन केले आहे.
#BreakingNews मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांना कोरोनाची लागण । चौहान यांची कोरोना विषाणूची चाचणी घेण्यात आली । त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला #coronavirus @ashish_jadhao #ShivrajSinghChouhan #COVID19 pic.twitter.com/x2ApKqgeIc
— ZEE २४ तास (@zee24taasnews) July 25, 2020
मुख्यमंत्री चौहान यांनी लोकांनी घाबरुन जावू नये. योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगत कोविड-१९वर वेळेवर उपाय झाला की व्यक्ती कोविडवर सहज मात करते. मी २५ मार्चपासून कोविड-१९बाबात माहिती घेत आहे आणि काम करत आहे. आता मी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून माहिती घेत राहणार आहे. माझ्या अनुपस्थितीत गृहमंत्री, नगरविकास मंत्री आणि आरोग्य, शिक्षणमंत्री राज्यातील परिस्थितीवर लक्ष ठेवतील, असे ट्विट मुख्यमंत्री चौहान यांनी केले आहे.
मेरे प्रिय प्रदेशवासियों, मुझे #COVID19 के लक्षण आ रहे थे, टेस्ट के बाद मेरी रिपोर्ट पॉज़िटिव आई है। मेरी सभी साथियों से अपील है कि जो भी मेरे संपर्क में आए हैं, वह अपना कोरोना टेस्ट करवा लें। मेरे निकट संपर्क वाले लोग क्वारन्टीन में चले जाएँ।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020
शनिवारी भारतातील कोरोनाव्हायरसचे एकूण प्रमाण १३ लाखांवर गेले आणि दोनच दिवसांत १२ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. भारतातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १३ लाख ३६ हजार ८६१ वर पोहोचली आहे. त्यापैकी ३१ हजार ३८८ लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात आतापर्यंत ८ लाख ४९ हजार ४३२ लोक बरे झाले आहेत. कोरोना अॅक्टीव्ह बाधितांची संख्या ४ लाख ५६ हजार ७१ इतकी असून कोरोना बरे होण्याचे प्रमाण ६३.५३ टक्के इतके आहे. गेल्या २४ तासात ७८७ लोकांचा बळी गेला आहे.
मैं #COVID19 की सभी गाइडलाइन्स का पालन कर रहा हूँ। डॉक्टर की सलाह के अनुसार स्वयं को क्वारन्टीन करूंगा। मेरी प्रदेश की जनता से अपील है कि सावधानी रखें, जरा सी असावधानी कोरोना को निमंत्रण देती है । मैंने कोरोना से बचने के हर संभव प्रयास किए लेकिन अनेक विषयों को लेकर लोग मिलते थे।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) July 25, 2020