'रिलायन्स' बुडता बुडता वाचली, भावानेच दिला मदतीचा हात!

आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय.

Updated: Nov 1, 2018, 11:51 AM IST
'रिलायन्स' बुडता बुडता वाचली, भावानेच दिला मदतीचा हात!

मुंबई : कर्ज न चुकवल्यानं रिलायन्स कम्युनिकेशन, रिलायन्स इन्फ्रटेल आणि रिलायन्स टेलिकॉम दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येऊन ठेपल्यात. अंबानी कुटुंबातील छोटा भाऊ अनिल अंबानी यांच्याकडे या कंपन्यांचे हक्क आहेत. अशा वेळी आपांपसातील कौटुंबिक वाद बाजुला सारून त्यांचे मोठे बंधु मुकेश अंबानी यांनी आपल्या लहान भावाला मदतीचा हात दिलाय. त्यामुळे राष्ट्रीय कंपनी कायदा अपीलीय न्यायाधिकरणानं (NCLAT) अनिल अंबानींना दिलासा देत दिवाळखोरी प्रक्रियेवर रोख लावलीय. 

या कंपन्याना आपली संपत्ती मुकेश अंबानी यांच्या अधिपत्याखाली असलेल्या रिलायन्स जिओला विकण्याची सशर्त परवानगी प्राधिकणानं दिलीय. एनसीएलएटीनं आरकॉम आणि याच्या सहकारी कंपन्यांना एरिक्सन इंडियाला ५०० करोड रुपयांची परतफेड करण्यासाठी १२० दिवस दिलेत... ही परतफेड करता आली नाही तर या कंपन्यांची दिवाळखोरी जाहीर करण्याचे निर्देशही देण्यात आलेत. ही १२० दिवसांची अवधी उद्यापासून अर्थात १ जून पासून सुरू होईल. 

भावानं दिलेल्या मदतीच्या हातामुळे आणि एनसीएलएटीच्या या निर्णयामुळे अनिल अंबानी यांना मोठा दिलासा मिळालाय. आपली संपत्ती रिलायन्स जिओला विकून २५ हजार करोड रुपये मिळण्याची शक्यता आहे.