नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 'सेवा दिन' म्हणून साजरा करण्याचे आदेश भारतीय जनता पार्टीने सर्व खासदार आणि आमदारांना दिले आहेत.
मोदींचा वाढदिवस १७ सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी हॉस्पिटल, बस स्टॅंड, तलाव, शाळा, महापुरूषांचे पुतळे, गार्डन, समाज भवन येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात यावी.
तसेच, वॉर्ड स्तरावर आणि झोपडपट्टी भागात मेडीकल कॅम्प लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्याचबरोबर २ ऑक्टोबर रोजी देशभर 'स्वच्छ २ ऑक्टोबर' साजरा केला जाणार आहे. या कालावधीत 'स्वच्छ ही सेवा' हे अभियान राबविले जाणार आहे.