नवीन पटनायक पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

नवीन पटनायक पाचव्यांदा ओडिशाचे मुख्यमंत्री

Updated: May 29, 2019, 12:21 PM IST
नवीन पटनायक पाचव्यांदा ओडिशाच्या मुख्यमंत्रीपदी, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा title=

भुवनेश्वर : ओडिशाचे मुख्यमंत्री म्हणून नविन पटनायक यांनी आज पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पटनायक यांच्या मंत्रिमंडळात ११ कॅबिनेट मंत्री आणि ९ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. पटनायक यांच्या मंत्रिमंडळात १० नव्या चेहऱ्यांना संधी मिळाली आहे. या शपथविधीसाठी तब्बल ७ हजार लोकांना निमंत्रण देण्यात आलं होतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील नवीन पटनायक यांना शुभेच्छा दिल्या. नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील आमंत्रण दिलं होतं. पण ते सहभागी होऊ शकले नाही.

नवीन पटनायक यांच्या शपथविधी सोहळ्याला त्यांची बहिण गीता मेहता या देखील सहभागी झाल्या होत्या. गीता मेहता देशातील एक नवाजलेल्या लेखिका आहेत.