सरकारी अधिकाऱ्यासाठी नितीन गडकरी प्रोटोकॉल तोडतात तेव्हा...

एरवी कोणत्याही कार्यक्रमात संबंधित विभागाच्या मंत्र्याचे भाषण झाल्यानंतर सचिव बोलतात. 

Updated: Sep 8, 2018, 05:22 PM IST
सरकारी अधिकाऱ्यासाठी नितीन गडकरी प्रोटोकॉल तोडतात तेव्हा...

नवी दिल्ली: मोदी सरकारमधील कार्यक्षम मंत्र्यांपैकी एक म्हणून नितीन गडकरी यांच्या नावाची दिल्लीत नेहमीच चर्चा असते. मात्र, शुक्रवारी आणखी एका प्रसंगामुळे गडकरी नव्याने प्रकाशझोतात आले आहेत. दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या ग्लोबल मोबिलिटी समीटच्यावेळी हा प्रकार घडला. यावेळी सार्वजनिक वाहतूक विभागाशी संबंधित कार्यक्रमासाठी गडकरी आले होते. यावेळी गडकरी यांनी आपले सचिव वाय.एस.मलिक यांच्यासाठी सरकारी प्रोटोकॉल बाजूला सारण्याचा दिलदारपणा दाखवला. 

एरवी कोणत्याही कार्यक्रमात संबंधित विभागाच्या मंत्र्याचे भाषण झाल्यानंतर सचिव बोलतात. मात्र, अनेकदा मंत्री आपल्या भाषणात अनेक मुद्द्यांना स्पर्श करत असल्याने सरकारी अधिकाऱ्यांना बोलायला फारसे असे काही उरत नाही. वाय.एस. मलिक यांनी कार्यक्रमापूर्वी मजेत ही गोष्ट गडकरींना बोलून दाखवली. 

त्यामुळे कार्यक्रम सुरु झाल्यानंतर गडकरींनी दिलदारपणा दाखवत मलिक यांना आधी भाषण करण्यास सांगितले. मलिक यांनी भाषणादरम्यान याचा खुलासाही केल्यानंतर सगळ्यांना याचा उलगडा झाला. त्यानंतर सभागृहात चांगलाच हशा पिकला.