..तर बंद होतील पेट्रोल, डिझेलच्या गाड्या

ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक आणि बायो इंधन या तंत्रज्ञानाचा विकास व्हायला हवा. 

Pravin.Dabholkar Pravin Dabholkar | Updated: Sep 12, 2017, 06:04 PM IST
..तर बंद होतील पेट्रोल, डिझेलच्या गाड्या  title=

नवी दिल्ली : मोठे ध्येय म्हणजे २०३० पर्यंत केवळ इलेक्ट्रॉनिक वाहनेच देशात असायला हवीत, केंद्र सरकारने २०३० पर्यंत केवळ इलेक्ट्रिक कारचे लक्ष्य ठेवून त्यावर काम करीत आहे अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. 

यासाठी त्यांनी नवीन तंत्रज्ञानावर संशोधन करण्याचा उद्योग क्षेत्राला सल्ला दिला आहे. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक आणि बायो इंधन या तंत्रज्ञानाचा विकास व्हायला हवा. आपले भविष्य पेट्रोल आणि डिझेल नव्हे तर पर्यायी इंधनच आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. रस्त्यांवर कारची संख्या वाढत आहे आणि जर ही संख्या वाढली तर रस्त्यावर वेगळी लेन बनवावी लागेल, असे त्यांनी सांगितले. 

चार्जिंग स्टेशन उभारणार

 इलेक्ट्रिक गाड्यांवरील कॅबिनेट नोट तयार झाले आहे. ज्यामध्ये चार्जिंग स्टेशनवर लक्ष देण्यात आले आहे. सरकार लवकरच इलेक्ट्रिक गाड्यांचे एक धोरण आणणार आहे. आपण पर्यायी इंधनकडे वळले पाहिजे. तुम्हाला आवडो किंवा न आवडो मी हे करणार आहे असेही गडकरी यांनी सांगितले.