सूरत : देशाच्या इतर राज्यांप्रमाणे गुजरातमध्येही कोरोना व्हायरसचा प्रकोप अधिकच वाढत आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव होवू नये म्हणून लोकाना नियमांचं पालन करण्यास सांगितलं जात आहे. यात मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे. तरी देखील अनेक लोक मास्कशिवाय घराबाहेर पडत आहेत. यामुळे मास्क घातला नाही तर अधिक दंड वसुली करण्यात येणार आहे.
घरातून मास्कशिवाय बाहेर निघणाऱ्यांवर, पान-तंबाखू खाऊन इतरत्र थुंकणाऱ्यांकडून मोठा दंड वसूल केला जाणार आहे. आधी हा दंड २०० रूपये होता. गुजरात हायकोर्टाच्या निर्णयानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. आधी हा दंड २०० रूपये होता.
वाढवून तो ५०० रूपये करण्यात आला आहे. सर्वांना मास्क उपलब्ध व्हावा म्हणून अमूल दुधाच्या काऊंटरवर २ रूपयाचा मास्क मिळणार आहे.