वास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क

तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Nov 21, 2017, 06:05 PM IST
वास्तवात दिसणारी पण, नकली असणारी शहरे पाहून तुम्ही व्हाल थक्क title=

मुंबई : तुम्ही जर सुट्टी साजरा करण्यासाठी दीर्घ सफरीचे नियोजन करत असाल तर, तुमच्यासठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत अशा शहरांबद्दल. जी डोळ्याला दिसतात. पण, वास्तवात ती नकली आहेत.

 नॉर्थ अमेरिका

नॉर्थ अमेरिकेतील मोजेव रेगिस्तानमध्ये असलेले हे शहर डोळ्यांना दिसते. पण, ते खरे नाही. वास्तवात तो एक मिलिटरी कॅम्प आहे. पण, दिसतो मात्र एखाद्या शहरासारखा. शस्त्रूला चकवा देण्यासाठी या शहराची उभारणी करण्यात आली आहे.

फ्रान्स

फ्रान्समधील जियोफरकोर्ट हे गावसुद्धा एखाद्या शहरासारखेच. या शहरात मोठ्या मोठ्या इमारती आहेत. पण, इथे लोक राहात नाहीत. केवळ शत्रूला चकवा देण्यासाठीच या शहराची निर्मिती करणयात आली आहे.

मॉस्को

रशियातील ऊफा नावाच्या शहराजवळ बनविण्यात आलेले हे आणखी एक शहर. जगभरातील शहरांसाऱखेच. पण, प्रत्यक्षात मात्र नकली. राजधानी मॉस्कोच्या अधिकृत शहरासारखीच या शहराचीही रचना. इतकी की, इथल्या मोठमोठ्या इमारती पाहून आपल्याला वाटेल की हेच खरे शहर आहे. पण, वास्तवात हे नकली शहर आहे.

इंग्लंड

इंग्लंडमधील ब्रिस्टल टाऊन शहराजवळ वसवलेले हे शहरही अत्यंत सुंदर आहे पण, इथे राहात मात्र कुणीच नाही. दिसायला सुंदर असणारे हे गाव केवळ शत्रूच्या डोळ्यात धुळफेक करण्यासाठी बनवले आहे.

कॅलिफोर्निया

अमेरिकेतील कॅलिफोर्निया स्टेटमधील अफगान स्टाईलमधील हे गाव एखाद्या शहराला मुळीच कमी नाही. पण, गंमत अशी की, या शहराला खिडक्या आणि दरवाजेच नाहीत. त्यामुळे इथेर राहण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. केवळ शत्रूला चकवा हेच कारण या शहराच्या उभारणीमामागे आहे.

स्वीडन

स्वीडनमधील हे सुंदर शहरही आर्मीने आपल्या व्हीकल टेस्टसाठी बनवले आहे.