दीड लाखाची Suzuki Intruder फक्त 58 हजारात; कंपनी देणार 1 वर्षाची वॉरंटी

 टू - व्हिलर सेक्टरमध्ये क्रुजर बाइकचा वाटा थोडाच असला तरी, या सेगमेंटच्या बाईकला लोकांची मोठी पसंती आहे. 

Updated: Oct 24, 2021, 01:55 PM IST
दीड लाखाची Suzuki Intruder फक्त 58 हजारात; कंपनी देणार 1 वर्षाची वॉरंटी

मुंबई : टू - व्हिलर सेक्टरमध्ये क्रुजर बाइकचा वाटा थोडाच असला तरी, या सेगमेंटच्या बाईकला लोकांची मोठी पसंती आहे. या क्रुजर बाइक सेगमेंटमध्ये यामाहा, सुजूकी, रॉयल एनफिल्ड, बजाज आणि होंडा सारख्या कंपन्यांच्या बाइकची संख्या सर्वाधिक आहे.

इंट्रुडर क्रुजर ही सुजूकीची लोकप्रिय बाइक आहे. जर तुम्ही या बाइकला कंपनीच्या शोरूम मधून खरेदी करणार असाल तर, त्यासाठी 1.27 लाख रुपये खर्च करावे लागतील. 

येथे आम्ही तुम्हाला अशा ऑफर बाबतीत सांगणार आहोत, ज्यामुळे 1.27 लाख रुपयांची बाइक फक्त 58 हजारात घरी घेऊन जाऊ शकतात. 

सेकंड हॅंड बाईक खऱेदी-विक्री करणारी वेबसाइट CARS24 ने या बाइकला आपल्या लिस्ट केले आहे. त्यासाठीची किंमत 58 हजार रुपये इतकी आहे.

वेबसाइटवर देण्यात आलेल्या माहितीनुसार हे या बाईकचे मॉडेल 2018 चे आहे. बाइक आतापर्यंत 3 लाख 71 हजार किलोमीटर धावली आहे. बाईकचे रजिस्ट्रेशन दिल्लीच्या आरटीओमध्ये आहे.

कंपनीच्या या बाइकला खरेदी करण्याच्या शर्थींसोबत 1 वर्षाची वारंटी आणि सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी मिळणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला बाईक न आवडल्यास तुम्ही ती 7 दिवसात परत करू शकता.