भारतात कोरोना वाढीचा दर अजूनही जास्तच; मेपर्यंत २.५ लाख लोक बाधित होण्याची शक्यता

गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती.

Updated: Apr 25, 2020, 12:18 PM IST
भारतात कोरोना वाढीचा दर अजूनही जास्तच; मेपर्यंत २.५ लाख लोक बाधित होण्याची शक्यता  title=
संग्रहित फोटो

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदींनी आजच्याच दिवशी गेल्या महिन्यात 25 मार्च रोजी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. आज देश लॉकडाऊन होऊन 1 महिना पूर्ण झाला आहे. मोदींनी लॉकडाऊन घोषित केला त्यावेळी देशात जवळपास 500 कोरोना रुग्ण होते. पण आज एक महिन्यानंतर कोरोना रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याची स्पष्ट चिन्ह आहेत.

24 मार्च रोजी कोरोना प्रकरणांची सरासरी वाढ 21.6% होती, जी आता 8.1 टक्क्यांपर्यंत घसरली आहे. 

जर लॉकडाऊन नसता तर आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या 2 लाखांच्या पुढे गेली असल्याचं सांगण्यात येत आहे.

भारतात लॉकडाऊन असतानाही, पाचव्या आठवड्यातही 8.1 टक्के असलेला वाढीचा दर सर्वात जास्त पीडित देशांच्या तुलनेत अद्यापही जास्त आहे. 

दरम्यान, जर्मनीत कोरोना वाढीचा दर 2 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे, तर अमेरिकेचा कोरोना वाढीचा दर 4.8% होता.

जर भारतात सध्याच्या दराने वाढ होत राहिली, तर पुढच्या आठवड्याच्या अखेरीस जवळपास 40000 प्रकरणं वाढू शकतात. पुढील 15 दिवसांत ती जवळपास 70000 च्या जवळपास आणि मे महिन्याच्या अखेरीस 2.5 लाखांच्या जवळपास पोहचण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

परंतु काही राज्यांनी कोरोना वाढीचा दर उत्तम व्यवस्थापनाद्वारे कमी केला आहे. केरळमध्ये कोरोना वाढीचा दर 1.8 टक्क्यांनीही कमी असून हा दर जर्मनीतील वाढीपेक्षाही कमी आहे. हे पाहता आगामी काळात सरासरी रुग्णांच्या वाढीत मोठी घसरण होऊ शकते.