Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. पाटणा येथे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या पुढाकाराने भाजपविरोधकांची बैठकी नुकतीच पार पडली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीसाठी देशातील १५ पक्षांच्या प्रमुख्यांनी उपस्थिती लावली.
महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह शिवसेना (ठाकरे गट)चे प्रमुख उध्दव ठाकरे, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत हे देखील उपस्थित होते.
देशातील प्रमुख पार्ट्यांचे नेते एकत्र आले आहेत. आम्ही वेगवेगळ्या पार्टीचे नेते आहोत, आमची विचारधारा वेगळी आहे, काही मतभिन्नता असू शकते पण आम्ही देशाची एकता टिकविण्यासाठी एकत्र आलो आहोत. यापुढे लोकशाहीवर आघात करण्याचा आम्ही विरोध करु असे उद्धव ठाकरे म्हणाले. जे देशद्रोही आहेत आणि ज्यांना हुकुमशाही आणायचीय, त्यांना आम्ही विरोध करु असे ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी नाव घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला.
जिथे भाजपची सत्ता आहे तिथे सांप्रदायिक परिस्थिती आहे. आपापसातले वाद विसरुन आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले. जयप्रकाश यांच्या नेतृत्वाखाली अशाच प्रकारे आंदोलनाची सुरुवात झाले. जे पुढे देशभरात पसरले. त्याप्रकारे नवी रस्ता दाखविण्याचे काम आम्ही सुरु केल्याचे शरद पवार यांनी सांगितले.