मुंबई : सोशल मीडियावर अनेक फोटोज व्हायरल होत असतात. या फोटोत काही फोटो हे स्टार्स कलाकारांचे तर काही फोटो हे ऑप्टिकल इल्युजनचे (Optical Illusion) असतात. असाचं ऑप्टिकल इल्युजनचा (Optical Illusion) एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हायरल फोटोतला नेमका सिनेमा कोणता आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. हा सिनेमा तुम्ही ओळखलात तर तुम्ही हूशार...
फोटोत काय?
फोटोत सिनेमातला एक सीन दाखवण्यात आला आहे. हा फोटो पाहून तुम्हाला कळालंच असेल हा मराठी सिनेमा आहे. या फोटोत रक्षाबंधनाचा सीन दाखवण्यात आला आहे. हा सिनेमा मराठीतला ब्लॉकबस्टर चित्रपट ठरला होता. आजही या सिनेमाची आठवण अनेकजण काढत असतात.
आता तुम्हाला सिनेमाचं नाव आठवेल?
या सिनेमाने आज 31 वर्षे पुर्ण केली आहेत. 18 सप्टेंबर 1991 रोजी हा सिनेमा रीलीज झाला होता. रिलीजनंतर हा सिनेमा खुप गाजला होता. हा सिनेमा तब्बल 28 आठवडे चित्रपटगृहात चालला होता. आता तरी तुम्हाला सिनेमाचे नाव ओळखता आले असेल.
सिनेमाचं हे नाव आहे?
तुम्ही अजूनही या सिनेमाचं नाव ओळखलं नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की, हा मराठीतला ब्लॉकबस्टर ठरलेला माहेरची साडी हा चित्रपट आहे. आजच्याच दिवशी 18 सप्टेंबर 1991 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. माहेरची साडी या चित्रपटात अभिनेत्री अल्का कुबल यांना सोशिक सूनेची भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर अल्का कुबल प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली होती. आता तुम्हाला या सिनेमाचं उत्तर मिळाले असेलच.
ऑप्टिकल इल्युजन (Optical Illusion) इतके मजेदार असते की प्रत्येकाला ते सोडवायला आवडते. एवढेच नाही तर ते सोडवल्यानंतर लोकांना त्यांच्या बुद्धीची आणि तीक्ष्ण नजरेची कल्पना येते.