पाकिस्तानकडून पुंछमध्ये पुन्हा गोळीबार

एलओसीवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.  पाकिस्तानी सैन्याने मंगळवार सकाळी जम्मूच्या पुंछ सेक्टरच्या बालाकोट आणि सौजेन भागात फायरिंग केली. पाकिस्तान दोन्ही भागात गोळीबार करत आहे. भारतीय जवानही पाकिस्तानला जोरदार प्रत्त्यूत्तर देत आहे.

Updated: Jul 18, 2017, 10:49 AM IST
पाकिस्तानकडून पुंछमध्ये पुन्हा गोळीबार title=

श्रीनगर : एलओसीवर पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आहे.  पाकिस्तानी सैन्याने मंगळवार सकाळी जम्मूच्या पुंछ सेक्टरच्या बालाकोट आणि सौजेन भागात फायरिंग केली. पाकिस्तान दोन्ही भागात गोळीबार करत आहे. भारतीय जवानही पाकिस्तानला जोरदार प्रत्त्यूत्तर देत आहे.

सोमवारी पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात एक भारतीय जवान शहीद झाला होता. राजौरी सेक्टरमध्ये सकाळी 7.30 वाजल्यापासून पाकिस्तान सतत गोळीबार करत आहे. पाकिस्तानी गोळीबारात मुदसीर अहमद शहीद झाले. अहमद ज्या बंकरमध्ये होते त्याच बंकरवर पाकिस्तानने फायरिंग केली. मुदसीर अहमद हे 37 वर्षाचे होते. ते पुलवामाचे राहणारे होते.